श्रीदेवीमुळे मी नर्व्हस : कतरिना कैफ

'जर श्रीदेवी तुम्हाला डान्स करताना पाहत असेल, तर तुम्ही काहीसे नर्व्हस दिसता' असं कॅप्शन कतरिनाने फोटोला दिलं आहे.

श्रीदेवीमुळे मी नर्व्हस : कतरिना कैफ

मुंबई : माधुरी दिक्षित, श्रीदेवी यासारख्या 80-90 च्या दशकातील डान्सर अभिनेत्री आजच्या काळातील अभिनेत्रींसाठी कायमच प्रेरणादायी ठरल्या आहेत. कतरिना कैफसाठीही श्रीदेवी इन्स्पिरेशनल आहे, त्यामुळे वर्कआऊट करताना शेजारी श्रीदेवीचा फोटो पाहूनही आपण नर्व्हस होत असल्याचं कतरिना सांगते.

कतरिनाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. वर्क आऊट आणि डान्स प्रॅक्टिसनंतरचा फोटो आहे. कतरिना थकून जमिनीवर बसली आहे. तिच्या शेजारी पाण्याची बाटली आहे, तर ती घामाघूमही झालेली दिसत आहे.

फोटोमध्ये स्टुडिओच्या भिंतीवर श्रीदेवीचं पोस्टर दिसत आहे. 'जर श्रीदेवी तुम्हाला डान्स करताना पाहत असेल, तर तुम्ही काहीसे नर्व्हस दिसता' असं कॅप्शन कतरिनाने फोटोला दिलं आहे.If @sridevi.kapoor was watching you dance ...... You’d look nervous too 😄


A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on
सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Katrina Kaif posts photo on Instagram, says Sridevi made me nervous latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV