सैफच्या मुलीच्या पहिल्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

अभिषेक कपूरने सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला ‘काय पो छे’चं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे अभिषेक कपूर आणि सुशांतसिंह राजपूत दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत.

By: | Last Updated: > Tuesday, 5 September 2017 12:12 PM
Kedarnath Poster released latest updates

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी तयार झालीय. अभिनेता सुशात सिंह राजपूत आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘केदारनाथ’ सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

हिमालयातले डोंगर, मंदिर आणि शिवशंकराची मूर्ती या पोस्टरवर दिसून येतात. शिवाय, दोन प्रेमींचे चेहरे काळ्या शेडमध्ये दिसतात. दिग्दर्शक अभिषेक कपूरने हे पोस्टर सोशल मीडियावरुन रिलीज केले आहे.

अभिषेक कपूरने पोस्टर शेअर करताना ट्वीटमध्ये म्हटलंय की, “शूटिंग सुरु होण्याच्या आदली रात्र नेहमीच मोठी असते. संपूर्ण टीमला प्रचंड उत्सुकता आहे आणि सकाळी 5 वाजता शूटिंग सुरु होणार आहे. त्याआधी तुम्ही इथे पोस्टर पाहू शकता.”

याआधी अभिषेक कपूरने सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला ‘काय पो छे’चं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे अभिषेक कपूर आणि सुशांतसिंह राजपूत दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतनेही आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरुन ‘केदारनाथ’चं पोस्टर रिलीज केलं आहे.

या सिनेमातून अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रेम कथेवर आधारित हा सिनेमा 2018 मध्ये उन्हाळ्यात रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Kedarnath Poster released latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली 2 : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही

विनोद खन्नांच्या मृत्यूनंतर उमेदवारी न दिल्याने पत्नी भाजपवर नाराज?
विनोद खन्नांच्या मृत्यूनंतर उमेदवारी न दिल्याने पत्नी भाजपवर...

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/09/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/09/2017

  कर्जमाफीसाठी एकूण 56 लाख 59 हजार शेतकऱ्यांचे अर्ज, मात्र 2

बलात्कार प्रकरणी भोजपुरी अभिनेत्याला अटक, पत्नीलाही बेड्या
बलात्कार प्रकरणी भोजपुरी अभिनेत्याला अटक, पत्नीलाही बेड्या

मुंबई : बलात्कार प्रकणात अटक असलेला भोजपुरी अभिनेता मनोज पांडे