करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके

हॅशटॅगमध्ये कंगनासह तिच्या बहिणीबद्दलही कमाल आर खानने आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.

करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके

मुंबई : सोशल मीडियावर असंबद्ध बडबड करण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खानने पुन्हा तोंड उघडलं आहे. अभिनेत्री करिना कपूरसोबत आपण गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असल्याचं ट्वीट त्याने केलं आहे.

करिनासोबतचा फोटो ट्वीट करत केआरकेने तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं आहे. मात्र हे करण्यामागे अभिनेत्री कंगना राणावतला डिवचणं हे एकमेव कारण आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/917612068429107200
कंगनाने हृतिकसोबत एक फोटो शेअर करत रिलेशनशीपबाबत दावा केला होता. हृतिकसोबत काढलेला फोटो हा आपल्याकडे एकमेव पुरावा असल्याचं तिने म्हटलं होतं. त्यानंतर हृतिकच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कंगनाविरोधात राळ उठवली होती.

हृतिकसोबतचे सेल्फी, हृतिकच्या पोस्टरसोबतचे फोटो, टीव्ही स्क्रीनवर असलेल्या हृतिकसोबत काढलेले फोटो असे निरनिराळे गमतीशीर फोटो ट्विटराईट्सनी शेअर केले. त्यासोबत #Iwasinrelationshipwithhrithik असा हॅशटॅग टाकत कंगनाला अनेकांनी ट्रोल केलं.

त्याचाच एक भाग म्हणून केआरकेने करिनासोबत रिलेशनशीपचं सनसनाटी ट्वीट केलं आहे. हॅशटॅगमध्ये कंगनासह तिच्या बहिणीबद्दलही त्याने आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. मात्र प्रसिद्धीच्या नादात करिनाची नाहक बदनामी केल्याने करिनाचे चाहतेही संतापले आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV