'कुंकू'फेम अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं रेल्वे अपघातात निधन

झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या 'कुंकू' मालिकेत त्याने जानकीचा भाऊ गण्याची भूमिका साकारली होती.

'कुंकू'फेम अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं रेल्वे अपघातात निधन

मुंबई : झी मराठीवरील 'कुंकू' मालिकेमुळे लोकप्रिय झालेला उदयोन्मुख अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झाल्याची दुःखद बातमी आहे. प्रफुल्लच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबासह मनोरंजन विश्वाला चटका बसला आहे.

सोमवारी पहाटे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये प्रफुल्ल कैलास भालेरावला प्राण गमवावे लागले. मुंबईत मालाडजवळ प्रफुल्लला अपघात झाल्याची माहिती आहे.

Kunku Serial Ganya

झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या 'कुंकू' मालिकेत त्याने जानकीचा भाऊ गण्याची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेमुळे प्रफुल्लचा चेहरा घराघरात पोहचला होता.

कलर्स वाहिनीवरील 'तू माझा सांगती', आवाज- ज्योतिबा फुले, 'स्टार प्रवाह'वरील नकुशी मालिकेतील त्याच्या भूमिकाही लोकप्रिय झाल्या होत्या. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'बारायण'मध्येही तो झळकला होता.

याशिवाय काही चित्रपट, मालिकांमध्ये काम करुन त्याने स्वतःची जागा निर्माण केली होती.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kunku fame Ganya a.k.a. actor Prafull Bhalerao died in railway accident in Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV