...तर आत्महत्या करेन, फॅनच्या धमकीनंतर वरुणची पोलिसात तक्रार

तिच्या त्रासाला कंटाळलेल्या वरुणने आपल्या वकिलाच्या कायदेशीर सल्ल्यानंतर याची माहिती जुहू पोलिसांनी दिली.

By: | Last Updated: > Thursday, 9 November 2017 8:28 AM
Lady fan threatens to kill herself, actor Varun Dhawan lodges complaint

मुंबई : अभिनेता वरुण धवनला त्याच्या एका फॅनचा इतका मनस्ताप झालाय की त्याला अखेर पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली. फॅन असलेली महिला वारंवार व्हॉट्सअॅप आणि फोन करुन त्याला त्रास देत होती. मात्र वरुण नाराज झाल्याने या महिला फॅनने आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे वरुणने या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे.

मेसेज पाठवणाऱ्या महिलेची आत्महत्येची धमकी
आपल्या तक्रारीत वरुण धवन म्हणाला की, “ही महिला सतत्याने व्हॉट्सअॅपवर मेसेज करत असे. यामुळे वैतागून तिचा नंबर ब्लॉक केला. यानंतर मला अनोळखी नंबरवरुन कॉल आला. हा कॉल महिला फॅनचा होता. व्हॉट्सअॅप मेसेजचं उत्तर न दिल्यास आत्महत्या करेन अशी धमकी तिने दिली.

तिच्या त्रासाला कंटाळलेल्या वरुणने आपल्या वकिलाच्या कायदेशीर सल्ल्यानंतर याची माहिती जुहू पोलिसांनी दिली. जुहू पोलिसांनी त्याला सांताक्रूझ पोलिसात तक्रार करण्यास सांगितलं. कारण त्याचं घर सांताक्रूझ पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतं.

सायबर पोलिसांकडे तपास
वरुण धवनच्या लेखी तक्रारीनंतर सांताक्रूज पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 506 अंतर्गत तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे. शिवाय या प्रकरणाची तक्रार सायबर पोलिसांनाही पाठवण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारीनंतर ज्या नंबरवरुन कॉल आला होता, त्याचा तपास सुरु आहे. सध्या हा नंबर बंद आहे.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Lady fan threatens to kill herself, actor Varun Dhawan lodges complaint
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा निषेधही नाही!
'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा...

मुंबई: गोव्यातील 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून

'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह
'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह

जयपूर : ‘पद्मावती’च्या विरोधाने आता हिंसक रुप घेतलं आहे.

...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!
...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!

मुंबई : अखेर 68 दिवसांचं कारण देत सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्ड फॉर

चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं
चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एका अॅडव्हेंचरपर फोटोमुळे अडचणीत

फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर
फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर

पणजी : ‘पद्मावती’ सिनेमाच्या प्रदर्शनावरुन सुरु झालेल्या वादात

संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा
संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा

पणजी (गोवा) : संजय भन्साळी कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांना

'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा
'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा

जयपूर : ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवर अभिनेत्री कंगना

‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मुंबई : ‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं

मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी
मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी

अहमदाबाद : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी

'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य
'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य

चंदीगड : ‘पद्मावती’ सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु