आमिरच्या 'लगान'मधील ईश्वर काकांचं निधन

जयपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आमिरच्या 'लगान'मधील ईश्वर काकांचं निधन

जयपूर : अभिनेता आमिर खानच्या लगान सिनेमात ईश्वर काकांची अविस्मरणीय भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचं दीर्घ आजारने निधन झालं. जयपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना रक्तदाब आणि अर्धांगवायूच्या आजाराने ग्रासलं होतं. अनेक दिवस आजाराला तोंड दिल्यानंतर आज अखेर जयपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.

श्रीवल्लभ व्यास यांनी जवळपास 50 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय काही मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. 2008 साली त्यांची प्रकृती बिघडली, त्यानंतर त्यांना ब्रेक घ्यावा लागला.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: lagaan fame ishwar kaka kaka vallabh vyas died at jaipur
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV