‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा

मुंबई : प्रदर्शनाआधीच वादात सापडलेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या 21 जुलैला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ प्रदर्शित होणार आहे. एकता कपूरनं सोशल मीडियावर या सिनेमाचं प्रमोशनही सुरु केलं आहे. गेल्या वर्षभरापासून हा सिनेमा सेन्सॉर सर्टिफिकेटच्या प्रतीक्षेत होता. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमातल्या अनेक गोष्टींवर आक्षेप घेत थेट सिनेमावर बंदी घालण्याचाच निर्णय घेतला होता. त्यासाठी बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सेन्सॉरच्या नियमावलीकडे बोट दाखवलं होतं.
सिनेमात महिलांचं चित्रण आक्षेपार्ह पद्धतीने केल्याचं आढळल्यास त्या सिनेमाला प्रमाणपत्र न देण्याचे अधिकार सेन्सॉर बोर्डाकडे असल्याचं सांगत निहलानी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 26 ऑक्टोबरला रिलीज होणारा हा सिनेमा खोळंबला होता. मात्र त्याविरोधात सिनेमाच्या टीमने जोरदार आवाज उठवला आणि आता त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक चित्रपट महोत्सवात सहभाग नोंदवला. एवढंच नाही तर तिथे या सिनेमाने अनेक पुरस्कारही आपल्या नावावर केलेत. कोंकणा सेन-शर्मा आणि रत्ना पाठक-शाह या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. अलंकृता श्रीवास्तव हिने ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV