माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज!

धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या गोड मुहूर्तावर माधुरीनेच चाहत्यांसोबत हे नाव शेअर केलं आहे.

माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज!

मुंबई : धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या गोड मुहूर्तावर माधुरीनेच चाहत्यांसोबत हे नाव शेअर केलं आहे.

माधुरी दीक्षितच्या आगामी सिनेमाचं ‘बकेट लिस्ट’ असं या सिनेमाचं नाव असून त्याचं पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. तेजस देऊस्कर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान हा सिनेमा रीलिज होणार आहे.

दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती कऱण्यात येत असून आज माधुरीने आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन सिनेमाचं पोस्टरही प्रसिद्ध केलं आहे. पोस्टरवरुन माधुरी गृहिणीच्या भूमिकेत असल्याचा अंदाज आहे.

https://twitter.com/MadhuriDixit/status/952433076923191296

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: madguri dixits marathi movies name announced today latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV