धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

"मराठी ही माझी मायभूमी आहे. या सिनेमातील भूमिका मला मराठीशी एकरुप होण्याची संधी देईल," अशी प्रतिक्रिया माधुरी दीक्षितने व्यक्त केली आहे.

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

मुंबई : लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर माधुरी लवकरच मराठी पडद्यावर झळकणार आहे.

ब्लू मस्टँग क्रिएशन्स आणि दार मोशन पिक्चर्स यांची निर्मिती असलेल्या आगामी मराठी चित्रपटात माधुरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तेजस देऊस्कर याच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली असून दिवाळीनंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल, अशी माहित आहे.

या सिनेमाचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. "मराठी ही माझी मायभूमी आहे. या सिनेमातील भूमिका मला मराठीशी एकरुप होण्याची संधी देईल," अशी प्रतिक्रिया माधुरी दीक्षितने व्यक्त केली आहे.

याआधी मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा माधुरीने केली होती. हा सिनेमा स्वप्निल जयकर दिग्दर्शित करणार असून तो 2018 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV