मिथुन चक्रवर्तींच्या मुलाचा पॉर्नस्टारसोबतचा फोटो व्हायरल

महाअक्षयने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. केडन क्रॉस ही अमेरितील पॉर्न इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे.

मिथुन चक्रवर्तींच्या मुलाचा पॉर्नस्टारसोबतचा फोटो व्हायरल

मुंबई : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्तीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये महाअक्षय एका पॉर्नस्टारसोबत दिसत आहे.

महाअक्षयने स्वत: हा फोटो शेअर करुन सांगितलं की केडन क्रॉससोबत त्याची भेट झाली. महाअक्षयने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. केडन क्रॉस ही अमेरितील पॉर्न इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे.

इतकंच नाही तर पॉर्न स्टारला भेटून महाअक्षय अतिशय खूश झाला आणि आपला आनंद व्यक्त करताना त्याने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, "तो क्षण जेव्हा तुम्ही सुंदर आणि नम्र केडन क्रॉसला भेटता."
महाअक्षय 'मिमोह' नावानेही ओळखला जातो. 'जिमी' या चित्रपटाद्वारे त्याने 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 2015 मध्ये आलेला 'इश्केदारियां' हा त्याचा अखेरचा सिनेमा होता. यानंतर त्याने जणू सिनेमातून ब्रेक घेतला आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV