बाबा रामदेव यांनी पतंजलीचं कंडोम बाजारात आणावं : राखी सावंत

‘हिंमत असेल तर बाबा रामदेव यांनी पतंजलीचं कंडोम बाजारात आणावं’, असं आव्हान नेहमी वादात राहणाऱ्या राखी सावंतनं दिलं आहे.

बाबा रामदेव यांनी पतंजलीचं कंडोम बाजारात आणावं : राखी सावंत

मुंबई : ‘हिंमत असेल तर बाबा रामदेव यांनी पतंजलीचं कंडोम बाजारात आणावं’, असं आव्हान नेहमी वादात राहणाऱ्या राखी सावंतनं दिलं आहे. लवकरच राखी सावंत एका कंडोमच्या जाहिरातीत झळकणार आहे.

राखी सावंतनं यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओही अपलोड केला आहे. 'बाबा रामदेव तुमच्या हिंमत असेल तर तुम्ही पतंजलीचे कंडोम तयार करा.' असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.दुसरीकडे केंद्र सरकारनं कंडोमच्या जाहिराती या रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच दाखवल्या जाव्यात, असा निर्णय घेतल्यानंतर राखी सावंतनं याबाबतही नाराजी व्यक्त केली होती. ‘माझी जाहिरात येणार असल्यामुळेच केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.’ असा दावाही राखी सावंतनं केला आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: make patanjali condoms rakhi sawant challenge to baba ramdev latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV