'न्यूड'ची कथा माझ्या कथेवरुन चोरली, हिंदी लेखिकेचा आरोप

प्रसिद्ध हिंदी लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ यांनी सिनेमाची कथा ढापल्याचा आरोप न्यूड सिनेमाच्या निर्मात्यांवर केला आहे.

'न्यूड'ची कथा माझ्या कथेवरुन चोरली, हिंदी लेखिकेचा आरोप

नवी दिल्ली: गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून हटवण्यात आलेला रवी जाधव यांचा न्यूड सिनेमा आणखी एका वादात सापडण्याची चिन्हं आहेत. प्रसिद्ध हिंदी लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ यांनी सिनेमाची कथा ढापल्याचा आरोप न्यूड सिनेमाच्या निर्मात्यांवर केला आहे.

न्यूड हा सिनेमा आपली लघुकथा ‘कालिन्दी’वरुन घेतल्याचा दावा मनिषा कुलश्रेष्ठ यांनी केला आहे. कालिंदीची कथा चोरुन न्यूड सिनेमा बनवल्याचा आरोप मनिषा यांनी केला आहे.

मनिषा कुलश्रेष्ठ यांनी ‘एबीपी न्यूज’शी बोलताना हा आरोप केला. मनिषा कुलश्रेष्ठ म्हणाल्या, “माझी कथा ‘कालिन्दी’ ही पूर्वीपासून सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध आहे. जेव्हा ‘न्यूड’ सिनेमा बनवला जात होता, त्यावेळी मी दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी संपर्कही साधला. मात्र त्यांनी त्यावेळी गोलगोल उत्तरं दिली. मात्र आता त्या सिनेमाचा टिझर रिलीज झाल्यानंतर, ही माझीच कथा असल्याचं समजलं”

nude

न्यूड या सिनेमात एक न्यूड मॉडेल चित्रकारांसाठी पोज देते,  हीच कथा मनिषा कुलश्रेष्ठ यांची लघुकथा कालिन्दीमध्ये आहे, असा त्यांचा दावा आहे.

“माझी कथा एक गरीब महिला जमुनाची आहे, जी न्यूड पोज देते. तिचा मुलगा आणि तिच्या वयात जास्त अंतर नाही. आई वाईट काम करते, असा मुलाचा आरोप आहे. ही पूर्णत: आई आणि मुलाची कथा आहे. माझ्या कथेत प्रोफेसरही आहे, न्यूड सिनेमात नसिरुद्दीन शाह यांना ती भूमिका दिली आहे”, असं मनिषा यांनी म्हटलं आहे.

रवी जाधवांशी संपर्क नाही

दरम्यान, लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ यांच्या आरोपानंतर, 'एबीपी माझा'ने रवी जाधव यांची बाजू ऐकण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यातच रवी जाधव यांनी स्वत:हून आपण मीडिया आणि सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याची फेसबुक पोस्ट काल लिहिली आहे, त्यामुळे त्यांची बाजू समजू शकलेली नाही.

न्यूडला इफ्फीतून वगळलं

20 नोव्हेंबरपासून गोव्यात इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) सुरु होणार आहे. या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या ‘एस दुर्गा’ या मल्ल्याळम आणि रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ या दोन चित्रपटांना सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता, अचानक वगळण्यात आलं.

इफ्फीमध्ये एकूण 9 मराठी चित्रपट दाखवले जाणार होते. मात्र रवी जाधव यांच्या सिनेमाला वगळल्यानंतर सर्व मराठी चित्रपटांचे निर्माते बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

रवी जाधव यांची फेसबुक पोस्टसंबंधित बातम्या

'न्यूड'वादावर एकजूट, मराठी सिनेमे 'इफ्फी'बाहेर पडणार?

 इफ्फी फेस्टिव्हलमधून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ सिनेमा वगळला


सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: manisha kulsreshth claims nude is copy of her short story kalindi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV