'न्यूड'वादावर एकजूट, मराठी सिनेमे 'इफ्फी'बाहेर पडणार?

रवी जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी गोवा चित्रपट महोत्सवातून सर्वच मराठी चित्रपट माघार घेण्याच्या विचारात आहेत.

'न्यूड'वादावर एकजूट, मराठी सिनेमे 'इफ्फी'बाहेर पडणार?

मुंबई : रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' चित्रपट 'इफ्फी' म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून वगळण्यात आल्यानंतर मराठी चित्रपट निर्माते एकवटले आहेत. रवी जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व मराठी चित्रपट या महोत्सवावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.

20 नोव्हेंबरपासून गोव्यात इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) सुरु होणार आहे. या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या 'एस दुर्गा' या मल्ल्याळम आणि रवी जाधव यांच्या 'न्यूड' या दोन चित्रपटांना सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता, अचानक वगळण्यात आलं.

इफ्फी फेस्टिव्हलमधून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ सिनेमा वगळला


मराठी चित्रपटसृष्टी या निर्णयाविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. रवी जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी गोवा चित्रपट महोत्सवातून सर्वच मराठी चित्रपट माघार घेण्याच्या विचारात आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी सर्वप्रथम निषेधाचा निर्णय घेतला.

इफ्फीमध्ये एकूण 9 मराठी चित्रपट दाखवले जाणार होते. मात्र रवी जाधव यांच्या सिनेमाला वगळल्यानंतर सर्व मराठी चित्रपटांचे निर्माते बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कोर्टाचे दरवाजे ठोठावणार

कोणतीही पूर्वसूचना न देता हे चित्रपट वगळण्यात आल्याने 'एस दुर्गा'चे दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय, तसंच इफ्फी विरोधात केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 'न्यूड'चे दिग्दर्शक रवी जाधव यांनीही मुंबई हायकोर्टात दाद मागण्यासाठी जुळवाजुळव सुरु केली आहे.

सुजॉय घोष यांचा राजीनामा

मंगळवारी ‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमा विभागाचे प्रमुख ज्युरी आणि चित्रपट निर्माते सुजॉय घोष यांनी ज्युरीपदाचा राजीनामा दिला.

रवी जाधव यांनी मंगळवारी फेसबुकवर न्यूड चित्रपटाचा टीझर पोस्ट केला होता. 'ज्या चित्रपटावरुन एवढा वाद चाललाय त्या 'न्यूड' चित्रपटाचा हा टीजर. जो वाद होतोय तो खरंच अत्यंत दुर्दैवी व खेदजनक आहे.' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

रवी जाधव यांची फेसबुक पोस्ट

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Marathi Movies to withdraw after Ravi Jadhav’s Nude thrown out of IFFI latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV