‘पद्मावत’विरोधात मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकार सुप्रीम कोर्टात जाणार

सिनेमा प्रदर्शनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आपल्या निकालावर पुनर्विचार करावा, यासाठी राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.

‘पद्मावत’विरोधात मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकार सुप्रीम कोर्टात जाणार

नवी दिल्ली : ‘पद्मावत’ सिनेमा पाठीमागचं शुक्लकाष्ठ सुरुच आहे. कारण, सिनेमातील वादग्रस्त ‘घूमर’ गाणं नव्यानं रिलीज करुनही सिनेमाला विरोध कायम आहे. शनिवारी राजपूत करणी सेनेने पत्रकार परिषद घेऊन विरोधावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. तर आता सिनेमा प्रदर्शनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आपल्या निकालावर पुनर्विचार करावा, यासाठी राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.

राजस्थानचे गृहमंत्री गुलाब चंद कटारिया यांनी सांगितलंय की, “राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही याचिका येत्या सोमवारी किंवा मंगळवारी दाखल केली जाईल.”

विशेष म्हणजे, याचिकेला बळ देण्यासाठी करणी सेनेनेही यात सहभागी व्हावं असं आवाहन गृहमंत्र्यंनी केलं आहे. या पुनर्विचार याचिकेत करणी सेनेसह मेवाडचे राजघराणंही सहभागी होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे या सिनेमावर बंदीसाठी मध्य प्रदेश सरकारही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी, “सिनेमावर बंदी घालावी यासाठी आपण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाणार आहोत.” असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राजपूत समाजाच्या प्रतिनिधी मंडळासोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी गेल्या 20 नोव्हेंबर रोजी पद्मावत सिनेमा राज्यात प्रदर्शित होणार नसल्याची घोषणा केली होती. पण या विरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने निर्मात्यांना दिलासा दिला होता. त्यामुळे सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

पण दुसरीकडे करणी सेनेने अजूनही आपला सिनेमाला विरोध कायम ठेवला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनादिवशीच करणी सेनेने भारत बंदची हाक दिली आहे. विशेष म्हणजे, दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने करणी सेनेला पत्राद्वारे सिनेमा पाहण्याची विनंती केली आहे. पण आपण सिनेमा पाहणार नसून त्याची होळी करु, असा इशारा करणी सेनेने दिला आहे.

संबंधित बातम्या

'पद्मावत'ला करणी सेनेचा विरोध कायम, 25 जानेवारीला 'भारत बंद'ची हाक

'घूमर' गाणं नव्याने रिलीज, दीपिकाची कंबर झाकून गाण्याचं नवं व्हर्जन

'पद्मावत' सिनेमा निरर्थक, अजिबात पाहू नका : ओवेसी

'पद्मावत'च्या निर्मात्यांना दिलासा, सर्व राज्यात प्रदर्शित होणार!

चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’वर बंदी, निर्माते सुप्रीम कोर्टात

केजीतील विद्यार्थ्याचा घूमर डान्स, करणी सेनेकडून शाळेत तोडफोड

‘पद्मावत’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर

अखेर मोठ्या वादानंतर ‘पद्मावत’ सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज

'घूमर'मध्ये दीपिकाची कंबर दिसणार नाही, बोर्डाच्या सूचनेनंतर बदल

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mp and rajasthan government going to supreme court against the release of padmavat releas
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV