अनुष्का शर्माला मुंबई महापालिकेकडून क्लीन चिट

अनुष्का शर्माला मुंबई महापालिकेकडून क्लीन चिट

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माला मुंबई महापालिकेने दिलासा दिला आहे. अवैध इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स बसवल्या प्रकरणी बीएमसीने अनुष्काला क्लीन चिट दिली आहे.

मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या बद्रिनाथ टॉवर्समध्ये अनुष्का शर्मा 20 व्या मजल्यावर राहते. अनुष्काने तिच्या फ्लॅटबाहेरील कॉमन पॅसेजमध्ये अवैधरित्या इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स बसवल्याची तक्रार शेजाऱ्यांनी एप्रिल महिन्यात महापालिकेकडे केली होती.

संबंधित कॉमन पॅसेज अनुष्का शर्माच्या मालकीचा असल्याचं स्थानिक वॉर्ड ऑफिसने तक्रारदाराला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अनुष्का शर्मा ही सेलिब्रेटी असल्यामुळे तिला झुकतं माप दिल्याचा दावा बत्रा यांनी केला आहे.

पालिका अधिकाऱ्यांनी पॅसेजमध्ये परीक्षण केल्यानंतर संबंधित इलेक्ट्रिक बॉक्स अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं सांगितलं होतं. शर्मा कुटुंबाने हा बॉक्स तात्काळ हटवावा, अशा सूचना पालिका अधिकाऱ्यांनी शर्मांना दिल्या होत्या. मात्र आता तो बॉक्स भिंतीवर लटकवलेला असल्याचं त्याच वॉर्ड ऑफिसने स्पष्ट केलं आहे. कॉमन पॅसेज शर्मा कुटुंबाच्या मालकीचा असल्यामुळे तो बॉक्स त्यांच्या घरातच असल्याप्रमाणे आहे, असंही पुढे पत्रात म्हटलं आहे.

सोसायटीचे माजी सेक्रेटरी सुनिल बत्रा यांनी 6 एप्रिलला पत्र लिहून महापालिकेकडे तक्रार केली होती. बद्रिनाथ टॉवरमध्ये सोळावा आणि सतरावा मजला बत्रा यांच्या मालकीचा आहे. शर्मांनी बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक बॉक्सविरोधात बत्रा यांनी आधी अग्निशमन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर बत्रांना महापालिकेकडे तक्रार करण्यास सुचवण्यात आलं.

बत्रांच्या तक्रारीनंतर महापालिकेने शर्मांना नोटीस बजावली होती. मात्र आपल्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा अनुष्काने केला होता. आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतरच पॅसेजमध्ये इलेक्ट्रिक बॉक्स बसवल्याचा दावा अनुष्काने केला होता.

संबंधित बातम्या :


अनुष्का शर्माला BMC ची नोटीस, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर कारवाई

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV