'पद्मावत'ला विरोध करणारे करणी सेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

सेन्सॉर बोर्डानं सिनेमा रिलीज करण्याची परवानगी दिल्यानंतर राजपूत समाजाचा विरोध कायम आहे. मुंबईतल्या सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाबाहेर करणी सेनेच्या वतीनं आज आंदोलन कऱण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

'पद्मावत'ला विरोध करणारे करणी सेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : ‘पद्मावती’ सिनेमाचं नामांतर ‘पद्मावत’ असं झालं, तरीही त्यामागील शुक्लकाष्ट काही संपायचं नाव घेत नाही. कारण सेन्सॉर बोर्डानं सिनेमा रिलीज करण्याची परवानगी दिल्यानंतर राजपूत समाजाचा विरोध कायम आहे. मुंबईतल्या सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाबाहेर करणी सेनेच्या वतीनं आज आंदोलन कऱण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

‘पद्मावत’ सिनेमाला करणी सेनेने सुरुवातीपासून तीव्र विरोध दर्शवला आहे. या सिनेमाद्वारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करणी सेनेने केला होता.

दुसरीकडे सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगवरुनही सेन्सॉर बोर्ड नाराज झालं होतं. सिनेमा प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवणे आवश्यक असताना, दिग्दर्शक संजय लिला भन्साळींनी सिनेमाचं काही संपादकांसाठी स्पेशल स्क्रिनिंग घेतल्याने, सेन्सॉर बोर्डाने तीव्र नाराजी व्यक्त करत, सिनेमाची कॉपी परत पाठवली होती. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख दिवसेंदिवस लांबणीवर पडत होती.

पण काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाने सिनेमाचं नाव बदलून पद्मावत करण्याच्या सूचना केल्यानंतर, सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. सिनेमा येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार, असे निर्मात्यांकडून सांगण्यात येत होते. पण तरीही सिनेमा पाठिमागचं शुक्लकाष्ठ संपण्याचं नाव घेत नाही आहे.

सिनेमाला सेन्सॉरने प्रमाणपत्र देऊन प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केल्याने, करणी सेना पुन्हा आक्रमक झाली आहे. करणी सेनेच्या वतीने आज मुंबई सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांनी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

संबंधित बातम्या

'पद्मावती'च्या नावातून आधी 'i' काढला, आता 'हे' अक्षर अॅड

'पद्मावत'मध्ये 300 कट्स नाहीत, प्रसून जोशींकडून वृत्ताचा इन्कार

प्रजासत्ताक दिनी ‘पॅडमॅन’ विरुद्ध ‘पद्मावती’ टक्कर

'पद्मावती'चं नाव बदलण्याची शक्यता, नवं नाव...

'पद्मावती'चं भविष्य इतिहासतज्ज्ञांच्या हाती, मार्चमध्ये रिलीज?

आधी 'पद्मावती' चित्रपट बघा, मग बोला, शाहीदचा संताप

‘पद्मावती’चं प्रदर्शन रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू संसदीय बोर्डाच्या कोर्टात

‘पद्मावती’ चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा

‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन

… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज

सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली

‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर

एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज

दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज

रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा

रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mumbai police arrested karni senas caders to protest on CBFC office
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV