चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एका अॅडव्हेंचरपर फोटोमुळे अडचणीत आला आहे. ट्रफिकमध्ये अडकला असतानाचा वरुणचा एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच आज 23 नोव्हेंबरच्या मिड डे या वर्तमान पत्रातही प्रसिद्ध झाला आहे. मात्र यावरुन मुंबई पोलिसांनी वरुणला चांगलंच झापलं आहे.

चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एका अॅडव्हेंचरपर फोटोमुळे अडचणीत आला आहे.  ट्रफिकमध्ये अडकला असतानाचा वरुणचा एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच आज 23 नोव्हेंबरच्या मिड डे या वर्तमान पत्रातही प्रसिद्ध झाला आहे. मात्र यावरुन मुंबई पोलिसांनी वरुणला चांगलंच झापलं आहे.

https://twitter.com/MumbaiPolice/status/933570850292461568

मुंबईत ट्रॅफिकमध्ये अडकला असताना अभिनेता वरुण धवनने गाडीतून शेजारच्या रिक्षातील चाहत्यासोबत सेल्फी काढला आणि ह्या सेल्फीचा फोटो आजच्या मिड डे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. त्यावरुन मुंबई पोलिसांनी वरुण धवनला चांगलंच झापलं आहे. “आम्ही तुझ्यासारख्या जबाबदार मुंबईकर आणि युथ आय़कॉनकडून खूप अपेक्षा करतो”, असं म्हटलं आहे. यासोबतच पोलिसांनी ई- चलनद्वारे वरुणला दंड ठोठावला आणि यापुढे पुन्हा असं केल्यास कडक कारवाई करु असंही पोलिसांनी बजावलं आहे.

https://twitter.com/Varun_dvn/status/933585803716038656

मुंबई पोलिसांच्या ट्विटला उत्तर देत अभिनेता वरुण धवनने पोलिसांची माफी मागत यापुढे सुरक्षेच्या दृष्टीनं आधी विचार करेन असं म्हटलं आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mumbai police slaps varun dhawan for his selfie with fan latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV