'मुंबई-पुणे-मुंबई'चा लवकरच तिसरा भाग येणार!

'मुंबई-पुणे-मुंबई'चा लवकरच तिसरा भाग येणार!

मुंबई : स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीचा मुंबई-पुणे-मुंबई हा सिनेमा जबरदस्त गाजला. पहिल्या भागात मनं जुळण्यापर्यंत एकत्र आलेले ते दोघं दुसऱ्या भागात अगदी धुमधडाक्यात विवाहबद्ध झाले. हा सिक्वेलसुद्धा रसिकांचा चांगलाच भावला.

या यशानंतर आता निर्मात्यांनी सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. सध्या या सिनेमाच्या लेखनाचे काम चालू असून वर्षाअखेरीस या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. तर पुढच्या वर्षी मुंबई-पुणे-मुंबई 3 प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

'पहिल्या दोन भागांवर रसिकांनी खूप प्रेम केलं. दुसरा भाग आल्यानंतर त्या कुटुंबाबाबत आणखी पाहण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. म्हणून आम्ही तिसऱ्या भागाची जुळवाजुळव केली. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. आम्हालाही याचं कौतुक वाटतंय. सध्या या सिनेमाच्या लेखनाचे काम सुरु असून आता याबाबत काही बोलणं योग्य ठरणार नाही,' असं सतीश राजवाडे म्हणाला.

या सिनेमातही 'मुंबई पुणे मुंबई'च्या दुसऱ्या भागात दिसलेली सगळी कलाकारांची फौज दिसणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV