मुंबईतील दादरच्या शारदा थिएटरला टाळं!

विशेष म्हणजे एकीकडे हिंदी चित्रपट दोन आठवड्यात उतरवले जात असताना मराठी चित्रपटांनी इथे सिल्व्हर ज्युबली केली.

मुंबईतील दादरच्या शारदा थिएटरला टाळं!

मुंबई : मुंबईतल्या दादर पूर्वमधलं शारदा थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शारदा थिएटर हे मध्य मुंबईतील महत्त्वाचं चित्रपटगृह आहे.

कॉन्ट्रॅक्ट रिन्यू न झाल्याचा फटका शारदा थिएटरला बसला आहे. 1972 पासून सुरु असलेल्या या चित्रपटगृहाचं कॉन्ट्रॅक्ट 30 नोव्हेंबर रोजीच संपलं असून सध्या मुंबई मराठी ग्रंथलायाकडे त्याचा ताबा आहे.

हे चित्रपटगृह हिंदी सिनेमांसाठी प्रामुख्याने ओळखलं जायचं. नमक हराम, यादों की बारात, शर्मिली यांसारखे हिंदी चित्रपट इथे प्रदर्शित झाले होते.

Sharada Theatre 2

मात्र ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांनी इथे मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. रामराम गंगाराम, ह्योच नवरा हवा यांसारखे चित्रपट इथे रिलीज झाले. विशेष म्हणजे एकीकडे हिंदी चित्रपट दोन आठवड्यात उतरवले जात असताना मराठी चित्रपटांनी इथे सिल्व्हर ज्युबली केली.

त्यामुळे दादरमधल्या मराठी वर्गाचं हक्काचं थिएटर म्हणून शारदा थिएटरची ओळख निर्माण झाली होती. पण आता 45 वर्षांनी हेच थिएटर बंद होण्याच्या मार्गावर आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Sharada Theatre in Dadar to shut down
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV