नागराज मंजुळेंच्या आगामी सिनेमात बिग बी दिसणार!

सैराट आणि फँड्री या सिनेमांच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता पुढील सिनेमावर काम करत आहेत. या सिनेमात सिनेमाचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन दिसणार असल्याची माहिती आहे.

नागराज मंजुळेंच्या आगामी सिनेमात बिग बी दिसणार!

मुंबई : सैराट आणि फँड्री या सिनेमांच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता नव्या सिनेमावर काम करत आहेत. या सिनेमात सिनेमाचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन दिसणार असल्याची माहिती आहे.

‘सैराट’ने गेल्या वर्षी मराठी सिनेमाची सर्व विक्रम मोडित काढले. त्यानंतर या सिनेमाचा तेलुगू आणि पंजाबी रिमेकही लवकरच भेटीला येणार आहे. तर निर्माता करण जोहरनेही हिंदी रिमेकसाठी या सिनेमाचे हक्क घेतले आहेत.

नागराज मंजुळे यांनी नव्या कथानकावर काम सुरु केलं आहे. हे कथानक अगोदर मराठी होतं, मात्र ‘सैराट’नंतर नागराज मंजुळे आता हिंदी सिनेमातही पदार्पण करणार आहेत. नागराज मंजुळेंनी या कथेवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून काम केलं आणि अमिताभ बच्चन यांना जानेवारीमध्ये सिनेमाचं कथानक दाखवलं.

अमिताभ बच्चन यांनी सिनेमाला होकार दिला असून या वर्षाअखेरपर्यंत सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आहे. नागराज मंजुळे हे स्वतः अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV