सिद्धूचा अश्लिल विनोद, वकिलाची मुख्य सचिवांकडे तक्रार

By: | Last Updated: > Monday, 10 April 2017 1:36 PM
Navjot Singh Sidhu in controversy for cracking offensive and vulgar jokes in Tha kapil sharma show

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ अद्याप कायम आहे. सुनील ग्रोव्हरसोबतचा वाद, घसरलेला टीआरपी, चॅनेलने कपिलला दिलेलं अल्टिमेटम हे सगळं ताजं असतानाच, आता शोमधील महत्त्वाचा चेहरा असलेले नवज्योतसिंह सिद्धू वादात सापडले आहेत.

पंजाबचे कॅबनेट मंत्री असलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांनी द्विअर्थी विनोद केल्याचा आरोप आहे. सिद्धूंनी अश्लिल आणि द्विअर्थी विनोद केल्याने, वरिष्ठ वकील एचसी अरोडा यांनी पंजाबच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे.

अरोडा यांचे आरोप

पत्नी आणि मुलीसोबत कपिलचा शो पाहात होतो. त्यावेळी सिद्धूंच्या आक्षेपार्ह विनोदामुळे भावना दुखावल्या, असं अरोडा यांनी म्हटलं आहे.

अरोडा यांच्या तक्रार अर्जात शोमधील काही विनोदांचा उल्लेख केला आहे. हे विनोद अभद्र आणि द्विअर्थी असल्याचा त्यांचा दावा आहे.

इतकंच नाही तर अरोडा यांनी पंजाब सरकारला मंत्रिपद आणि आचारसंहितेची आठवण करुन दिली. तसंच हे प्रकरण पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यापर्यंत पोहोचवण्याचीही मागणी केली आहे.

सिद्धूने माहिती आणि प्रसारण कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा अरोडा यांनी केला आहे. तसंच याप्रकरणी हायकोर्टातही जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सिद्धूंचं स्पष्टीकरण

दरम्यान, सिद्धूंनी अरोरा यांचे आरोप फेटाळले आहेत. जर या शोमध्ये अश्लिलता असती, तर हा शो लोकप्रियतेमध्ये अव्वल नसता, असं सिद्धूंनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर लोक फळं लागलेल्या झाडाला दगड मारतातच, असं टोलाही लगावला.

हायकोर्टात याचिका

दरम्यान, एच सी अरोरा यांनी मंत्री असलेल्या सिद्धू यांच्या शोमधील सहभागावरच आक्षेप घेतला आहे. त्याबाबत त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी गेल्या आठवड्यात सुनावणी झाली, त्यावेळी हे मंत्र्यांच्या नैतिकतेचं उल्लंघन नाही का? असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. तसंच पंजाब सरकारला नोटीसही पाठवली होती.

याप्रकरणी पुढील सुनावणी 11 मे रोजी होणार आहे.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Navjot Singh Sidhu in controversy for cracking offensive and vulgar jokes in Tha kapil sharma show
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Navjot singh sidhu Tha kapil sharma show
First Published:

Related Stories

'टॉयलेट' करणाऱ्या पुरुषाचा फोटो पोस्ट, ट्विंकलवर टीकास्त्र
'टॉयलेट' करणाऱ्या पुरुषाचा फोटो पोस्ट, ट्विंकलवर टीकास्त्र

मुंबई : मिसेस फनी बोन्स अशा टोपणनावाने नर्मविनोदी शैलीत लेखन करणारी

...म्हणून सलमानच्या घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार नाही!
...म्हणून सलमानच्या घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार नाही!

मुंबई : अभिनेता सलमान खान गणपती बाप्पाचा केवढा मोठा भक्त आहे हे

तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला
तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान आपल्या बिनधास्त

कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर
कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर

मुंबई : आपल्या समाजातील तरुणी, मग त्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक

शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज
शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज

सोलापूर : अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षा योजनेची गरज

मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी
मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन

सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर
सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर

कोची : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची क्रेझ किती आहे याचं ताजं

नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?
नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नुकतीच

‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र
‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन

VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज
VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज

मुंबई : अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा टीझर