नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'बाबुमोशाय बंदूकबाज'चा दमदार ट्रेलर रिलीज

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'बाबुमोशाय बंदूकबाज'चा दमदार ट्रेलर रिलीज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'बाबुमोशाय बंदूकबाज' या सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरमध्ये नवाजुद्दीनला पाहून 'गँग्ज ऑफ वासेपूर'मधील त्याची भूमिका डोळ्यांसमोर येते. 'बाबुमोशाय बंदूकबाज'मध्ये नवाजुद्दीन कॉन्ट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या डायलॉगवरुन अंदाज येतो की यात मारधाड, हाणामारी पाहायला मिळणार आहे.

ट्रेलरमध्ये नवाजुद्दीनचा देशी रोमँटिक स्टाईलही उत्कृष्ट आहे. तर अभिनेत्री दिव्या दत्ताची एन्ट्री चित्रपटातील नव्या ट्विस्टकडे इशारा करते.

चित्रपटाची कहाणी नवाजुद्दीन आणि दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट किलरसोबत लावलेल्या पैजेच्या भोवती फिरते. दोन किलर्सला तीन लोकांना मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं. त्यावेळी नवाजुद्दीन दुसऱ्या कि‍लरला म्हणतो की, "जिसने तीन में से दो लोगों को पहले मार दिया उसे तीनों को मारने के पूरे पैसे मिलेंगे और जो हार गया वो ये धंधा छोड़ देगा."

कुशन नंदी हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. सिनेमात दिव्या दत्ताशिवाय बंगाली अभिनेत्री बिदिता बेगही प्रमुख भूमिकेत आहे.

पाहा ट्रेलर

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV