करिनाचा मुलगा तैमूरचा नवा फोटा सोशल मीडियावर व्हायरल

करिनाचा मुलगा तैमूरचा नवा फोटा सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : करिना कपूर खान आणि सैफ आली खान यांचा मुलगा तैमूर अली खान याचा एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये करिनाने आपल्या लहानग्या तैमूरला हातात घेतलं आहे. तर दुसऱ्या फोटोत गोजिरवाण्या तैमूरला पाहून अनेकांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

वास्तविक सैफ आणि करिनाच्या लहानग्याचा हा पहिलाच फोटो नाही. यापूर्वी देखील तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोवर सोशल मीडियामध्ये अक्षरश: लाईकचा पाऊस पडत आहेत.

करिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवर नुकतेच दोन फोटो पोस्ट केले असून, या दोन्ही फोटोंना हजारो लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत. करिनासोबतच्या फोटोला 11 हजारच्या वर लाईक्स मिळाले आहेत. तर तैमूरच्या फोटोला तब्बल 54,786 लाईक आणि १४१० कमेंट आल्या आहेत.OH LOOK!????????????


A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorkhanbegum) on


????????????

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on
तैमूर सैफ अली खान आपल्या जन्मच्या पूर्वीपासून सदैव चर्चेत राहिला आहे. त्याच्या जन्मावेळी त्याच्या नावावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. शिवाय त्याचं नाव ट्विटरवरही ट्रेंडिंगमध्ये होतं.

दरम्यान, करिना आणि सैफच्या लहानग्या तैमूरचेही सर्वजण चाहते झाले आहेत. त्यामुळे जेव्हा कधीही तैमूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, तेव्हा लाईक्स आणि कमेंटसचा अक्षरश: पाऊस पडतो.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV