आता सनी लिऑनसोबत करा जंगल सफारी

‘डिसकव्हरी’वरील लोकप्रिय शो ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’च्या भारतीय व्हर्जनचं होस्टिंग अभिनेत्री सनी लिऑन करणार आहे.

आता सनी लिऑनसोबत करा जंगल सफारी

मुंबई : बॉलिवूडची बेबीडॉल अर्थात अभिनेत्री सनी लिऑनसोबत तुम्हाला जंगल सफारी करता येणार आहे. थांबा... प्रत्यक्षात जंगलात जाता येणार नाही. पण तसा अनुभव मात्र घेता येणार आहे. घरबसल्या जंगलात फिरुन आल्याचा अनुभव देण्यासाठी सनी लिऑन खास कार्यक्रम घेऊन येत आहे.

‘डिसकव्हरी’वरील लोकप्रिय शो ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’च्या भारतीय व्हर्जनचं होस्टिंग अभिनेत्री सनी लिऑन करणार आहे. याआधी तिने एमटीव्हीसाठी ‘स्पिल्ट्सविला’ शोचं होस्टिंग केले होते.

‘मॅन व्हर्सेस वाईल्ड विथ सनी लिऑन’ असे सनीच्या नव्या शोचं नाव असून, यातही स्टंट असल्याने सनी लिऑन स्वत: या शोबाबत उत्सुक असल्याचे दिसते.

पुढल्या वर्षषापासून म्हणजेच 2018 पासून सनी लिऑनचा हा नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Now Sunny Leone to hosts Discovery’s show latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV