'भल्लालदेव' आता छोट्या पडद्यावर, टीझर लॉन्च

'भल्लालदेव' आता छोट्या पडद्यावर, टीझर लॉन्च

मुंबई : 'बाहुबली' सिनेमातील 'भल्लालदेव' आता छोट्या पडद्यावर येणार आहे. अभिनेता राणा डग्गुबत्ती लवकरच मालिकेत दिसणार आहे. ट्विटरवरुन आपल्या नव्या टीव्ही शोबाबत राणा डग्गुबत्तीने माहिती दिली आहे. शिवाय, टीझरही लॉन्च केला आहे.

"तुमच्या आवडत्या स्टारसोबत मैत्री सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आता थेट तुमच्या घरी येणार आहोत...नंबर 1 यारी विथ राणा", असं ट्वीट करत राणा डग्गुबत्तीने टीझर रिलीज केला आहे.

याचसोबत राणाने आणखी एक ट्वीट करुन म्हटलं आहे की, "टीव्ही एक असं माध्यम आहे, जे मला नेहमीच आकर्षित करतं. याच माध्यमातून मी थेट तुमच्या घरी येतोय 'नंबर 1 यारी विथ राणा'चा होस्ट बनून."

एस. एस. राजामौलीच्या 'बाहुबली' सिनेमात 'भल्लालदेव'ची भूमिका साकारल्यानंतर राणा डग्गुबत्तीची सिनेसृष्टीत दबदबा वाढला आहे. राणाची छोट्या पडद्यावरील मालिका जेमिनी टीव्हीवर टेलिकास्ट होणार असून, कधीपासून शो सुरु होईल याबाबत अद्याप कळू शकलेलं नाही.

दरम्यान, राणा डग्गुबत्तीचा आगामी सिनेमा 'नेने राजू, नेने मंत्री'ही लवकरच रिलीज होणार असून, यामध्ये राजकीय नेत्याच्या भूमिकेत राणा असेल.

https://twitter.com/RanaDaggubati/status/874957268374044672

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV