'संस्कारी' पहलाज निहलानींचा बोल्ड 'जुली-2' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचा 'जुली-2' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, या सिनेमात सिनेअभिनेत्री राय लक्ष्मीने अतिशय बोल्ड सिन दिले आहेत.

By: | Last Updated: > Monday, 4 September 2017 7:00 PM
P Nihalani julie-2-bold-trailer-released

मुंबई : आपल्या कार्यकाळात अनेक सिनेमांना कात्री लावून चर्चेत राहणारे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कारण त्यांच्या अपकमिंग ‘जुली-2’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, या सिनेमात सिनेअभिनेत्री राय लक्ष्मीने अतिशय बोल्ड सिन दिले आहेत.

‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमाच्या प्रोमोमध्ये ‘इंटरकोर्स’ शब्द वापरल्याप्रकरणी निहलानी यांच्या अपकमिंग ‘जुली-2’ मध्ये अतिशय बोल्ड सिन चित्रित केले आहेत. या सिनेमाचा टीझर आज रिलीज झाला असून, त्यात अभिनेत्री राय लक्ष्मीच्या बोल्ड लूकमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

‘जुली-2’ चं दिग्दर्शन दीपक शिवदसानी यांनी केलं असून, या सिनेमाचा पहिला ट्रेलर अतिशय बोल्ड आहे. हा सिनेमा येत्या 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

 

दरम्यान, आपल्या सिनेमाबद्दल पहलाज निहलानी यांनी प्रतिक्रिया देताना, सेन्सॉर बोर्डाचा वापर आपल्या फायद्यासाठी केलेला नसल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या मते, ”या सिनेमाबद्दल सेन्सॉर बोर्डाची जी काही मतं असतील, ती सर्व मान्य असतील,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे या सिनेमाशी संबंधित अनेक फोटो सिनेअभिनेत्री राय लक्ष्मी वेळोवेळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करत असते. ‘जुली-2’ हा नेहा धुपियाच्या जूली या सिनेमाचा सीक्वेल असून, हा सिनेमादेखील प्रदर्शनानंतर सर्वाधिक चर्चेत राहिला होता.

सिनेमाचा ट्रेलर पाहा

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:P Nihalani julie-2-bold-trailer-released
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचं पोस्टर रिलीज
नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचं पोस्टर रिलीज

मुंबई : ‘फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही

विनोद खन्नांच्या मृत्यूनंतर उमेदवारी न दिल्याने पत्नी भाजपवर नाराज?
विनोद खन्नांच्या मृत्यूनंतर उमेदवारी न दिल्याने पत्नी भाजपवर...

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/09/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/09/2017

  कर्जमाफीसाठी एकूण 56 लाख 59 हजार शेतकऱ्यांचे अर्ज, मात्र 2