नीरज पांडे आणि अक्षय कुमार बॉक्स ऑफिसवर आमनेसामने

नीरज पांडे यांचा 'अय्यारी' आणि अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' एकाच दिवशी रिलीज होतोय.

नीरज पांडे आणि अक्षय कुमार बॉक्स ऑफिसवर आमनेसामने

मुंबई : बॉलिवूड सिनेमातील एक महत्त्वाचं समीकरण मानली जाणारी जोडी दिग्दर्शक नीरज पांडे आणि अभिनेता अक्षय कुमार 26 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर आमनेसामने असतील. नीरज पांडे यांचा 'अय्यारी' आणि अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' एकाच दिवशी रिलीज होतोय.

नीरज पांडे यांच्या अय्यारी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात मनोज वाजपेयी, सिद्धार्थ मल्होत्रा, अनुपम खेर आणि नसरुद्दीन शाह हे अभिनेते असतील. तर पॅडमॅन हा अक्षय कुमारचा सामाजिक विषयावरील सिनेमा आहे, ज्यात अक्षय कुमारसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे दिसतील.

अय्यारीचा ट्रेलर :'अय्यारी' हा देशभक्तीवर आधारित सिनेमा आहे. तर अक्षय कुमारचा पॅडमॅन हा सामाजिक विषयावरील. त्यामुळे दोन्ही सिनेमात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण नीरज पांडे आणि अक्षय कुमार यांनी यापूर्वी स्पेशल 26, बेबी यांसारख्या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर एकत्र धुमाकूळ घातला आहे. मात्र आता दोघे एकमेकांसमोर उभे ठाकतील.

प‌ॅडमॅनचा ट्रेलर :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: padman and Aiyaary to release on same day
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV