‘पद्मावत’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर

हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.

‘पद्मावत’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर

मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमाची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.

दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंह यांनीही सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सेन्सॉर बोर्डाने पाच बदलांसह सिनेमाला यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांना हा सिनेमा पाहता येणार नाही.

‘पद्मावत’ हा देशातला पहिला सिनेमा आहे जो 3D IMAX हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानुसार, निर्मात्यांना सिनेमाचे नाव बदलण्यास सांगण्यात आलं होतं. यानंतरच निर्मात्यांनी ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ केलं.

करणी सेनेच्या विरोधानंतर या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. मात्र काही बदलांनंतर सिनेमा रिलीज करण्यास सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली आहे. दरम्यान, राजस्थान, गुजरातमध्ये या सिनेमाच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Padmavat movie official release date announced
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV