'पद्मावती'चं नाव बदलण्याची शक्यता, नवं नाव...

करणी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने 'पद्मावती'संदर्भात वाद निर्माण झाला होता. राजपुतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे.

'पद्मावती'चं नाव बदलण्याची शक्यता, नवं नाव...

नवी दिल्ली : बहुप्रतिक्षीत आणि वादात अडकलेल्या संजय लीला भन्साली यांच्या 'पद्मावती' सिनेमाचं नाव बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिनेमाचं नाव 'पद्मावती'ऐवजी 'पद्मावत' होण्याची शक्यता आहे.

काही बदलांसह चित्रपट लवकरच प्रदर्शित करता येणार आहे. 'पद्मावती' चित्रपटाचं नाव आणि घुमर गाण्यात बदल केल्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित केला जाऊ शकतो, असं सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

विरोधामुळे प्रदर्शन लांबणीवर

करणी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने 'पद्मावती'संदर्भात वाद निर्माण झाला होता. राजपुतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे.

'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं.

केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाच्या बैठकीत निर्णय

सेन्सॉर बोर्डने स्थापन केलेल्या केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने चित्रपट पाहिल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. सिनेमाशी संबंधित वाद संपावा, असा यामागचा उद्देश आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विशेष समितीमध्ये उदयपूरचे अरविंद सिंह मेवाड, डॉ. चंद्रमणी सिंह, जयपूर विद्यापीठाचे प्राध्यापक के.के सिंह यांचा समावेश होता. 28 डिसेंबरला सेन्सॉर बोर्डाची बैठक झाली.

बदल केल्यानंतर सिनेमाला U/A प्रमाणपत्र दिलं जाईल, असं सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे. तसंच चित्रपटात डिस्क्लेमर असणं बंधनकारक आहे, अशी स्पष्ट सूचनाही करण्यात आली आहे.

सेन्सॉर बोर्डाची पुढील बैठक जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईन, असं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं आहे.

दीपिका, शाहिद आणि रणवीर प्रमुख भूमिकेत

राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पादूकोण असून शाहिद कपूरने राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.

रणवीर सिंह पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.

संबंधित बातम्या


'पद्मावती'चं भविष्य इतिहासतज्ज्ञांच्या हाती, मार्चमध्ये रिलीज?

आधी 'पद्मावती' चित्रपट बघा, मग बोला, शाहीदचा संताप

‘पद्मावती’चं प्रदर्शन रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू संसदीय बोर्डाच्या कोर्टात

‘पद्मावती’ चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा

‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन

… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज

सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली

‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर

एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज

दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज

रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा

रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Padmavati cleared by censor board; title to be changed to Padmavat
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV