बहुप्रतीक्षित 'पद्मावती'चा लोगो रिलीज, फर्स्ट लूकची उत्सुकता शिगेला!

सुफी कवी मल्लिक मुहम्मद जायसी यांनी अलाऊद्दीन खिलजी आणि पद्मावती यांच्यातील प्रसंग लिहिले होते. पद्मावतीला मिळवण्यासाठी अलाऊद्दीन खिलजीने मोठी आक्रमणं केली होती.

बहुप्रतीक्षित 'पद्मावती'चा लोगो रिलीज, फर्स्ट लूकची उत्सुकता शिगेला!

मुंबई : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका आणि संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्शन असलेल्या 'पद्मावती' सिनेमाचा लोगो रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या नावाचा लोगो रिलीज केला असून, उद्या पहिला लूक रिलीज करण्यात येणार आहे.

'बाजीराव मस्तानी' सिनेमानंतर संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या नावाचा लोगो सोशल मीडियावरुन रिलीज करण्यात आला.

https://twitter.com/taran_adarsh/status/910437501059219457

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता रणवीर सिंह हा अलाऊद्दीन खिलजीची भूमिका साकारणार आहे, तर दीपिका पादुकोण ही राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे.

सुफी कवी मल्लिक मुहम्मद जायसी यांनी अलाऊद्दीन खिलजी आणि पद्मावती यांच्यातील प्रसंग लिहिले होते. पद्मावतीला मिळवण्यासाठी अलाऊद्दीन खिलजीने मोठी आक्रमणं केली होती.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' सिनेमा बिग बजेट आहे. रणवीर आणि दीपिका यांनी याआधीही संजय लीला भन्साळींसोबत काम केलं आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: logo Padmawati पद्मावती लोगो
First Published:
LiveTV