'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह

धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाशेजारी भिंतीवर कोळशाने लिहिलं आहे की, "आम्ही केवळ पुतळे जाळत नाही, तर लटकवतोही."

'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह

जयपूर : 'पद्मावती'च्या विरोधाने आता हिंसक रुप घेतलं आहे. जयपूरच्या नाहरगड किल्ल्याच्या भिंतीवर एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला.

धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाशेजारी भिंतीवर कोळशाने लिहिलं आहे की, "आम्ही केवळ पुतळे जाळत नाही, तर लटकवतोही." पोलिसांनी हा मृतदेह खाली उतरवला असून मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

तसंच चेतन तांत्रिकचं नावही भिंतीवर लिहिलेलं आहे. असं म्हटलं जातं की, चेतन तांत्रिक राजा रतन सिंहच्या दरबारात होता आणि तिथून हाकलल्यानंतर तो अल्लाऊद्दीन खिलजीला जाऊन भेटला. त्यानेच खिलजीला पद्मावतीबाबत सांगितलं होतं.

दुसरीकडे 'पद्मावती' सिनेमाच्या विरोधात या तरुणाने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. परंतु त्याने खरंच आत्महत्या केली की त्याला मारुन लटकवण्यात आलं, याचा तपास सुरु आहे.

तर तरुणाची हत्या दुसऱ्या उद्देशाने केली असावी आणि त्यानंतर या प्रकरणाला पद्मावती वादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात असावा, असंही सूत्रांचं म्हणणं आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Padmavati protest turns violen, body found hanging in Nahargarh fort
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV