दीपिकाचा जबरदस्त लूक, 'पद्मावती'चं नवं पोस्टर रिलीज

विशेष म्हणजे या पोस्टरवर प्रदर्शनाची तारीख 30 नोव्हेंबर लिहिली आहे. तर भारतात 'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी सिनेमागृहांमध्ये झळकेल.

By: | Last Updated: > Wednesday, 8 November 2017 3:29 PM
Padmavati’s new poster out, Deepika Padukon will surely take your breath away

मुंबई : संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’बाबत दरदिवशी वाद वाढतच आहे. ठिकठिकाणी सिनेमाविरोधात निदर्शनं सुरु आहेत. तसंच चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी देत आहेत.

याचदरम्यान सिनेमाचं आणखी एक पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये दीपिका पादूकोणच्या हातात आग असलेलं एक भांडं दिसत आहे. मोकळे केस आणि दागिन्यांनी मढलेली दीपिका चहूबाजूंनी लाल रंगाच्या साड्या नेसलेल्या महिलांनी वेढलेली आहे. हा क्लायमॅक्सचा सीन म्हणजे जोहरचा असल्याचं म्हटलं जात आहे.

दीपिकाचा हा लूक प्रेक्षकांना आवडत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विशेष म्हणजे या पोस्टरवर प्रदर्शनाची तारीख 30 नोव्हेंबर लिहिली आहे. तर भारतात ‘पद्मावती’ 1 डिसेंबर 2017 रोजी सिनेमागृहांमध्ये झळकेल. मात्र हा सिनेमा यूएईमध्ये एक दिवस आधी म्हणजे 30 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पादूकोण, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. तर पद्मावती चित्रपटात रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.

संबंधित बातम्या

‘पद्मावती’मधील ‘घुमर’ गाणं रिलीज, दीपिकाचा अनोखा अंदाज

‘पद्मावती’तील दीपिकाचा फर्स्ट लूक, रिलीज डेटही निश्चित!

रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं

‘पद्मावती’त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ?

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?

भन्साळीच ‘पद्मावती’तील दृश्यांवर कात्री चालवणार!

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Padmavati’s new poster out, Deepika Padukon will surely take your breath away
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा निषेधही नाही!
'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा...

मुंबई: गोव्यातील 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून

'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह
'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह

जयपूर : ‘पद्मावती’च्या विरोधाने आता हिंसक रुप घेतलं आहे.

...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!
...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!

मुंबई : अखेर 68 दिवसांचं कारण देत सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्ड फॉर

चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं
चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एका अॅडव्हेंचरपर फोटोमुळे अडचणीत

फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर
फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर

पणजी : ‘पद्मावती’ सिनेमाच्या प्रदर्शनावरुन सुरु झालेल्या वादात

संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा
संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा

पणजी (गोवा) : संजय भन्साळी कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांना

'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा
'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा

जयपूर : ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवर अभिनेत्री कंगना

‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मुंबई : ‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं

मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी
मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी

अहमदाबाद : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी

'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य
'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य

चंदीगड : ‘पद्मावती’ सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु