पद्मिनी कोल्हापुरेंचा मुलगा प्रियांक बॉलिवूडच्या वाटेवर

वोह सात दिन सारख्या चित्रपटांमुळे गाजलेली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि निर्माते प्रदीप शर्मा यांचा प्रियांक हा मुलगा.

पद्मिनी कोल्हापुरेंचा मुलगा प्रियांक बॉलिवूडच्या वाटेवर

मुंबई : बॉलिवूड दिवा श्रद्धा कपूरचा मावसभाऊ आणि प्रख्यात अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक शर्मा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

थिएटर वर्कशॉप, डान्स आणि जिम अशी सर्वांगीण मेहनत घेत प्रियांक व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याचा प्रयत्न करत आहे. वोह सात दिन सारख्या चित्रपटांमुळे गाजलेली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि निर्माते प्रदीप शर्मा यांचा प्रियांक हा मुलगा. प्रियांकच्या रक्तातच अभिनय भिनल्याचं पद्मिनी यांनी 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

तो बऱ्याच महिन्यांपासून डान्स शिकत आहे. थिएटरचे वर्कशॉप करत आहे. 'फटा पोस्टर निकला हिरो' सिनेमासाठी राजकुमार संतोषींना त्याने सहाय्यही केलं, असं पद्मिनी कोल्हापुरे सांगतात. लहानपणापासूनच त्याला ऑफर येत होत्या, मात्र ती वेळ योग्य नव्हती, असं पद्मिनींना वाटतं.

पद्मिनी, शिवांगी आणि तेजस्विनी या कोल्हापुरे भगिनींची पुढची पिढीही चित्रपटसृष्टीत आहे. श्रद्धा आणि सिद्धांत कपूर यांनी बॉलिवूडमध्ये नशिब आजमवल्यानंतर प्रियांकही आता पदार्पणाच्या तयारीत आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Padmini Kolhapure’s son Priyank Sharma ready to make film debut latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV