प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष, पहलाज निहलानी यांना डच्चू

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन हटवण्यात आलं असून, त्या जागी गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री विद्या बालनलाही सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.

By: | Last Updated: > Friday, 11 August 2017 8:04 PM
Pahlaj Nihalani sacked as CBFC chief latest update

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन हटवण्यात आलं असून, त्या जागी गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री विद्या बालनलाही सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

पहलाज निहलानी यांनी तीन वर्ष सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या तीन वर्षातील त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली. त्याशिवाय त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर टीकाही झाली होती.

तसेच निहलानी यांना पदावरुन हटवण्यासाठी त्यांची आडमुठी भूमिकाही कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सिनेक्षेत्रातूनही त्यांच्यावर वारंवार टीका सुरु होती.

विशेष म्हणजे, त्यांना केरळ हायकोर्टाच्या अवमान प्रकरणी नोटीसही बजावण्यात आली होती. हायकोर्टाने निहलानी यांना ‘का बॉडीस्केप्स’ सिनेमासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितलं होतं. पण बोर्डाच्या सदस्यांनी 4 वेळा हा सिनेमा पाहूनही यावर निर्णय घेतला नसल्यानं, कोर्टानं त्यांना अवमान नोटीस बजावली होती.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहलाज निहलानी यांची हकालपट्टी निश्चित होती. त्यांच्या जागी निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश झा आणि ‘चाणक्य’ मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश यांच्या नियुक्तीची चर्चा होती. पण या दोन्ही नावांना बाजूला करत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसून जोशी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

कोण आहेत प्रसून जोशी ?

  • प्रसून जोशी हे बॉलिवूडमध्ये कवी, लेखक आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील आघाडीच्या गीतकारांमध्ये त्यांची गणना होते.  त्यांना आत्तापर्यंत तीनवेळा त्यांना फिल्मफेअर, दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये गीत लेखनासह संगीत दिग्दर्शनही केलं आहे.
  • दिल्ली-6, तारे जमीन पर, रंग दे बसंती, हम तुम, फना या सिनेमांसाठी त्यांनी गीत लेखन केलं आहे. तर लज्जा, आंखे, क्योंकि या सिनेमासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शनही केलं आहे.
  • ‘तारे जमीन पर’ या सिनेमातील ‘माँ’ या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यातही आलं. तसेच 2015 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • ‘फना’ सिनेमातील ‘चाँद सिफारीश’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमातील ‘जिंदा’ या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Pahlaj Nihalani sacked as CBFC chief latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मराठमोळ्या अमित मसुरकरचा 'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीत
मराठमोळ्या अमित मसुरकरचा 'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीत

मुंबई : मनोरंजन विश्वातला अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सर्वात मोठा

लता मंगेशकर यांच्या खोट्या सहीने लाखोंचा गंडा
लता मंगेशकर यांच्या खोट्या सहीने लाखोंचा गंडा

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची खोटी सही घेऊन, लाखो रूपये

‘हसीना पारकर’च्या संवादावर आक्षेप, सिनेमाविरोधात हायकोर्टात याचिका
‘हसीना पारकर’च्या संवादावर आक्षेप, सिनेमाविरोधात हायकोर्टात...

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला आगामी आणि

संदीप कौर ते बॉम्ब शेल बँडिट, खऱ्या ‘सिमरन’चा थरारक प्रवास
संदीप कौर ते बॉम्ब शेल बँडिट, खऱ्या ‘सिमरन’चा थरारक प्रवास

मुंबई : 21 वर्षांची तरुणी… जुगारात हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी थेट

सुशांत सिंग राजपूत 'द ग्रेट खली'च्या भूमिकेत?
सुशांत सिंग राजपूत 'द ग्रेट खली'च्या भूमिकेत?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत पुन्हा एकदा बायोपिक

'पद्मावती'तील दीपिकाचा फर्स्ट लूक, रीलिज डेटही निश्चित!
'पद्मावती'तील दीपिकाचा फर्स्ट लूक, रीलिज डेटही निश्चित!

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोनची मुख्य भूमिका असलेल्या

मनोज वाजपेयीच्या ‘रुख’चा ट्रेलर रिलीज
मनोज वाजपेयीच्या ‘रुख’चा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘रुख’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता मनोज वाजपेयी

बहुप्रतीक्षित 'पद्मावती'चा लोगो रिलीज, फर्स्ट लूकची उत्सुकता शिगेला!
बहुप्रतीक्षित 'पद्मावती'चा लोगो रिलीज, फर्स्ट लूकची उत्सुकता...

मुंबई : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका आणि संजय

'पद्मावती'त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ?
'पद्मावती'त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा सध्या लाखो तरुणींच्या हृदयाची

राम रहीमचं वादग्रस्त जीवन पडद्यावर, हनीप्रीतच्या भूमिकेत राखी सावंत
राम रहीमचं वादग्रस्त जीवन पडद्यावर, हनीप्रीतच्या भूमिकेत राखी...

मुंबई : बलात्कारी बाबा राम रहीमचं वादग्रस्त जीवन लवकरच मोठ्या