माहिरा खानचा 'वर्ना' सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत

सत्तेचा गैरवापर करुन राज्यपालांचा मुलगा कसा बलात्काराच्या आरोपातून सुटतो, यावर 'वर्ना' चित्रपटाचं कथानक बेतलं आहे

माहिरा खानचा 'वर्ना' सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत

मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. रईसच्या वेळचा वाद, रणबीरसोबत स्मोक करतानाचे व्हायरल फोटो यानंतर माहिराच्या 'वर्ना' सिनेमाला पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने आडकाठी केली आहे.

खुदा के लिये, बोल यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक शोएब मन्सूर यांच्या 'वर्ना' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दाखवलेला नाही. हा चित्रपट 17 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता त्याचा 'बिग लाहोर प्रिमियर'ही रद्द करावा लागला आहे.

सत्तेचा गैरवापर करुन राज्यपालांचा मुलगा कसा बलात्काराच्या आरोपातून सुटतो, यावर 'वर्ना' चित्रपटाचं कथानक बेतलं आहे. त्यामुळेच पाक सेन्सॉर बोर्डाने हा सिनेमा रोखून धरल्याचं म्हटलं जात आहे.

'बलात्काराचा विषय आहे. दोषी राज्यपालांचा मुलगा दाखवला आहे. म्हणून चित्रपटावर बंदी आणण्याची गरज नाही. काही सीन्सना कात्री लावून आणि थोडे बदल करुन सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो.' असं सिंध बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरचे सरचिटणीस अब्दुल खुहावर म्हणाले. संपूर्ण चित्रपट मंडळाने हा सिनेमा अद्याप पाहिला नसून, त्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह आहे की नाही, यावर निर्णय होईल, असंही ते म्हणाले.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pakistani actress Mahira Khan starrer Verna movie faces censor board
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV