चित्रपटात पुनरागमनाच्या निर्णयामुळे वीणा मलिकचा घटस्फोट

चित्रपटात पुनरागमनाच्या निर्णयामुळे वीणा मलिकचा घटस्फोट

मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक तीन वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेत आहे. वीणाचा चित्रपटसृष्टी पुनरागमनाचा निर्णय न पटल्याने त्यांचा काडीमोड होत असल्याचं वृत्त आहे. 'मिसमालिनी.कॉम' या वेबसाईटने यासंदर्भात बातमी दिली आहे.

'बिग बॉस'च्या घरात अभिनेता अश्मित पटेलसोबतच्या जवळीकतेमुळे पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक चर्चेत होती. मात्र शो संपताच दोघांचं कथित प्रेम प्रकरण संपुष्टात आलं आणि वीणाने दुसरीकडे सूत जमवलं. डिसेंबर 2013 मध्ये वीणा असाद खट्टकशी दुबईत विवाहबद्ध झाली.

चित्रपटसृष्टीमध्ये पुनरागमन करण्याचा वीणाचा मानस होता. मात्र तो न पटल्यामुळे दोघांमध्ये वादविवाद झाले. एक वर्षांचा मुलगा अमल आणि दोन वर्षांचा मुलगा अबराम यांची काळजी वीणाने घ्यावी, अशी असादची इच्छा होती. मात्र वीणाने त्याचं म्हणणं न ऐकल्यामुळे ते वेगळे राहायला लागले.

जानेवारी महिन्यापासून दोघं वेगवेगळे राहत आहेत, त्यानंतर वीणाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. असादने मात्र त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही, किंवा कोर्टातही हजर झाला नाही. त्यामुळे कोर्टाने वीणाची मागणी मान्य केली आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV