मराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर, 'पानिपत'चं पोस्टर रिलीज

आशुतोष गोवारीकर आता पानिपतमधील मराठ्यांच्या अजरामर लढाईवर सिनेमा बनवणार आहेत.

मराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर, 'पानिपत'चं पोस्टर रिलीज

मुंबई : दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा 'मोहेंजोदरो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. पण गोवारीकर पुन्हा एकदा पीरियड फिल्मवर हात आजमावणार आहेत. आशुतोष गोवारीकर आता पानिपतमधील मराठ्यांच्या अजरामर लढाईवर सिनेमा बनवणार आहेत.

गोवारीकर यांनी 'पानिपत-द ग्रेट बेट्रेयल' या नव्या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली असून त्याचा फर्स्ट लूकही जारी केला आहे. पोस्टर शेअर करताना आशुतोष यांनी लिहिलं आहे की, "इतिहासाच्या कथा कायमच मला आकर्षित कतात. यावेळी ही कहाणी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबाबत आहे. हे पाहा पहिलं पोस्टर."पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित हा सिनेमा आहे. या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृती सेनन हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. जबरदस्त अॅक्शन असलेल्या ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला 2018 च्या मध्यापासून सुरुवात होईल. तर 6 डिसेंबर 2019 रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अर्जुन कपूर आणि संजय दत्त एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिनेमात अर्जुन मराठा योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्तचीही महत्त्वाची भूमिका आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Panipat teaser poster released, Ashutosh Gowariker announces next film
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV