'पिपली लाईव्ह', 'पानसिंह तोमर' फेम अभिनेते सिताराम पांचाल यांचं निधन

"मित्रांनो माझी मदत करा. कॅन्सरमुळे माझी अवस्था बिकट होत आहे. तुमचा कलाकार भाऊ सीताराम पांचाल," अशी ही पोस्ट होती.

By: | Last Updated: > Thursday, 10 August 2017 1:13 PM
Peepli Live, Paan Singh Tomar actor Sitaram Panchal passes away

मुंबई : ‘पानसिंह तोमर’ आणि ‘पीपली लाईव्ह’ यांसारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते सीताराम पांचाल यांचं निधन झालं. आज सकाळी 8:30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल.

मागील चार वर्षांपासून ते किडनी आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. यादरम्यान त्यांचं वजन कमी होऊन 30 किलोच राहिलं होतं.

सीताराम पांचाल यांनी स्लमडॉग मिलेनिअर, द लीजंड ऑफ भगत सिंह, जॉली एलएलबी 2, सारे जहां से महंगा, हल्ला बोल, बँडिट क्वीन यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. पण अखेरच्या काळात त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी महागडे उपचार सोडून आयुर्वेदिक उपचार घेण्याचा प्रयत्न केला.

मित्रांकडून मदत
काही दिवसांपूर्वी त्यांच्या मदतीसाठी सोशल मीडियावर एक पोस्टही व्हायरल झाली होती. “मित्रांनो माझी मदत करा. कॅन्सरमुळे माझी अवस्था बिकट होत आहे. तुमचा कलाकार भाऊ सीताराम पांचाल,” अशी ही पोस्ट होती.

Sitaram_Panchal_1
मागील साडेतीन वर्षांपासून बॉलिवूडमधील त्यांचे काही मित्र मदत करत होते. यामध्ये इरफान खान, पांचाल यांच्या एनएसडी बॅचमेट संजय मिश्रा, रोहिताश गौड, टीवी निर्माता (एक घर बनाऊंगा) राकेश पासवान यांचा समावेश आहे. ट्विटरवर दिग्दर्शक अश्विनी चौधरी यांसारख्या अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला.

राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या सिनेमाशी संबंध
सीताराम पांचाल यांनी लाडो या हरियाणवी सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सीताराम पांचाल यांचा जन्म हरियाणाच्या कॅथल जिल्ह्यातील डूंडर हेडी गावात 1963 मध्ये झाला होता. त्यांनी ‘लाडो’ शिवाय ‘छन्नो’ सिनेमातही काम केलं आहे.

शाळेपासूनच अभिनयाची आवड
पांचाल यांना शाळेपासूनच अभिनयाची गोडी होती. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानतंर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांची निवड झाली. यानतंर त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये विविध चरित्र भूमिका साकारल्या. त्यांच्या घरात पांचाल कमावणारे एकटेच होते. त्यांना 19 वर्षांचा मुलगा असून जो अजून शिकत आहे

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Peepli Live, Paan Singh Tomar actor Sitaram Panchal passes away
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात

ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा
ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा

नवी दिल्ली : ड्रग्ज तस्करी प्रकरणी फरार घोषित करण्यात आलेली कोणे

आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!
आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या

सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री
सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री

मुंबई : सेन्सॉर बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवण्यापूर्वी पहलाज

‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!
‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!

मुंबई : सुपरहिट ‘शोले’ सिनेमाच्या प्रदर्शनाला आज 42 वर्षे पूर्ण झाली.

... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?
... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या

मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत
मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत

मुंबई : ‘बॉलिवूडमधला प्रॉमिसिंग चेहरा’ अशी ख्याती असलेला

अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..
अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरदीन खान दुसऱ्यांदा बाबा झाला. फरदीनने

सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!
सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान लवकरच आई बनणार आहे.

बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?
बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?

मुंबई: बॉलिवूडमधील खराखुरा कॉमेडीयन म्हणून ज्यांची ओळख आहे, ते