झायराशी विमानात असभ्य वर्तन करणारा अटकेत!

मुंबईतील सहार पोलिसांनी ही कारवाई केली.

झायराशी विमानात असभ्य वर्तन करणारा अटकेत!

मुंबई : अभिनेत्री झायरा वसीमशी दिल्ली-मुंबई विमानात छेड काढणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विकास सचदेव असं या व्यक्तीचं नाव असून तो मीडिया एंटरटेनमेंट कंपनीत काम करतो. मुंबईतील सहार पोलिसांनी ही कारवाई केली.

'दंगल गर्ल' झायरा वसिम सोबत विमानात झालेल्या असभ्य वर्तन प्रकरणी मुंबईतील सहार पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कलम 354 अन्वये आणि झायरा अल्पवयीन असल्यामुळे 'पोस्को' अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला . झायरासोबत झालेल्या असभ्य वर्तनाची थेट राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे.

मुंबई पोलिसांनी सहार पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना झायरा राहत असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन तिने केलेल्या तक्रारीकडे लक्ष देण्याचे आदेश दिले होते.

'दंगल गर्ल' झायराशी विमानात छेडछाड, केबिन क्रूचा कानाडोळा


एअर विस्ताराच्या विमानात छेडछाड झाल्याचा आरोप झायराने इन्स्टाग्रामवर केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेतली. याबाबत काय कारवाई केली, याचा अहवाल देण्यास विमान कंपनीला सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, एअर विस्ताराने ट्वीट करुन झायराची माफी मागितली आहे. या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगत झायराला वेळोवेळी मदत करण्याचं आश्वासनही विस्ताराने दिलं आहे. असे प्रकार आम्ही कधीच खपवून घेत नाही, असंही एअर विस्ताराने स्पष्ट केलं आहे.

https://twitter.com/airvistara/status/939683874350747649

https://twitter.com/airvistara/status/939731693736300544

काय आहे प्रकरण?

एअर विस्ताराच्या विमानाने झायरा दिल्लीहून मुंबईला येत होती. त्यावेळी विमानात झायराच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीनं आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचं झायराने सांगितलं. विशेष म्हणजे या प्रकाराची विमानातील कर्मचाऱ्यांकडे तक्रार देऊनही कुणीही आपल्या मदतीला न आल्याचा दावा तिने केला आहे.

सुरुवातीला विमान हेलकावे खात असल्याच्या कारणावरुन आपण दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर विमानातील दिवे बंद होताच त्याने पुन्हा असभ्य वर्तन केल्याचं झायराने सांगितलं. मी व्हिडिओ काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र लाईटच्या कमतरतेमुळे ते शक्य झालं नसल्याचं झायरा म्हणाली.

सीटच्या मागून हा इसम झायराच्या पाठीला आणि मानेला पाय लावत होता. केबिन क्रू किंवा विमानातील सहप्रवाशी आपल्या मदतीला न आल्याचंही झायराने सांगितलं.

झायराच्या तक्रारीला कोणीही दाद न दिल्यामुळे तिने मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर इन्स्टाग्राम लाईव्हवरुन आपली व्यथा मांडली. घडलेला प्रकार सांगताना झायरला अक्षरशः रडू कोसळलं. मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का? असा प्रश्न उपस्थित करताना तिला अश्रू अनावर झाले.

संबंधित बातम्या :

झायरा वसिमसोबत असभ्य वर्तन, पोस्को अंतर्गत गुन्हा


'दंगल गर्ल' झायराशी विमानात छेडछाड, केबिन क्रूचा कानाडोळा

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: person arrested who misbehaved with actor ziara wasim
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: ziara wasim झायरा वसीम
First Published:
LiveTV