‘हसीना पारकर’च्या संवादावर आक्षेप, सिनेमाविरोधात हायकोर्टात याचिका

झुबैर खान असं याचिकाकर्त्यांचं नाव असून त्यांनी शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या रिलीजवर स्थगिती आणण्याची मागणी केलीय.

‘हसीना पारकर’च्या संवादावर आक्षेप, सिनेमाविरोधात हायकोर्टात याचिका

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला आगामी आणि बहुचर्चित सिनेमा 'हसीना पारकर' विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर करण्यात आलीय. या सिनेमाचं नाव आणि यातील वास्तववादी संवाद यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

‘हसीना पारकर’ या सिनेमाविरोधात याचिका दाखल केलीय. झुबैर खान असं याचिकाकर्त्यांचं नाव असून त्यांनी शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या रिलीजवर स्थगिती आणण्याची मागणी केलीय. इतकंच नव्हे तर सेन्सॉर बोर्डानं या सिनेमाला सर्टिफिकेट कसं जारी केलं याचीही चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलीय.

मात्र हायकोर्टानं तूर्तास या याचिकेवर कोणतेही निर्देश देण्यास स्पष्ट नकार दिलाय. तसेच जर या सिनेमामुळे वास्तवातील त्या व्यक्तीला अथवा तिच्या कुटुंबियांना आक्षेप असेल तर त्यांनी हायकोर्टात याचिका करावी. मग त्याचा विचार करता येईल असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV