'पायरेट्स ऑफ कॅरेबियन-5' हॅक, ऑनलाईन लीक करण्याची धमकी

'पायरेट्स ऑफ कॅरेबियन-5' हॅक, ऑनलाईन लीक करण्याची धमकी

वॉशिंग्टन/मुंबई : रॅनसमवेअर व्हायरसने जगभरात दहशत पसरवली आहे. त्यातच आता जॉनी डेपचा पायरेट्स ऑफ कॅरेबियन-5 हा सिनेमा हॅक केल्याचा दावा हॅकर्सने केला आहे. पैसे द्या अन्यथा सिनेमा ऑनलाईन लीक करु, अशी धमकी दिल्याची माहिती आहे.

पायरेट्स ऑफ कॅरेबियन सीरिजचा हा पाचवा सिनेमा आहे. Pirates of the Caribbean: Dead Men Tell No Tales असं या सिनेमाचं नाव आहे.

सिनेमा 24 मे रोजी सुरुवातील इटलीमध्ये रिलीज केला जाणार आहे. सिनेमा खरोखर हॅक केला आहे का, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र गेल्या आठवड्यात अशीच एक घटना घडल्यामुळे हॅकर्सच्या या दाव्यावर विश्वास ठेवला जात आहे.

अमेरिकेतील प्रसिद्धी टीव्ही मालिका ऑरेंज इज द न्यू ब्लॅक हॅकर्सने ऑनलाईन लीक केली होती. त्यामुळेच हा सिनेमाही पैसे न दिल्यास लीक केला जाऊ शकतो, असं बोललं जात आहे.

सिनेमा लीक होण्यापासून रोखण्यासाठी निर्मात्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे, ज्यासाठी निर्माते तयार नाहीत. त्यांनी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआयशी संपर्क केल्याची माहिती आहे.

काय आहे रॅनसमवेयर व्हायरस?

अनेक देशात रेनसमवेयर नावाच्या कम्प्युटर व्हायरसला सायबर हल्ल्यासाठी जबाबदार  मानलं जातं. यूजर्सकडून पैसे उकळण्यासाठी या व्हायरसचा वापर केला जातो.

रॅनसमवेअरपासून बचाव कसा कराल?

  • तुम्हाला एखाद्या अनोळखी, व्यक्तीचा किंवा कंपनीचा ई-मेल आला असेल, तर तो ओपन करु नका

  • ई-मेल करणारा व्यक्ती ओळखीचा आहे, मात्र ई-मेलचा विषय दररोजपेक्षा वेगळा किंवा तुमच्या कामाशी मिळता जुळता, विस्कळीत असेल तरीही तो ई-मेल ओपन करु नये.

  • जी-मेल, याहू, हॉटमेल आणि रेडिफमेलवर तुमचे वैयक्तीक मेल ओपन करणं टाळावं.

  • पेन ड्राईव्ह, पर्सनल पेन ड्राईव्ह किंवा कंपनीच्या एक्स्टर्नल हार्ड डिस्कचा वापर टाळावा.

  • ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करताना सावधानता बाळगा

  • फेसबुक, लिंकडेन आणि ट्विटरचा वापर कमीत कमी करुन अनोळखी जाहिराती किंवा मेसेज ओपन करु नये.

  • तुमची सिस्टम हॅक झाल्याचा संशय आला, किंवा काही एरर मेसेज आल्यास तातडीने आयटी टीमशी संपर्क साधा


संबंधित बातम्या :

भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य, RBI ला अलर्ट जारी


अनेक देशात सायबर हल्ला, रेनसमवेयर व्हायरसमुळे कम्प्युटर ठप्प

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV