पॉर्नस्टार मिया खलिफाचं चित्रपटसृष्टीत पदार्पण

सनी लिओननंतर भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करणारी मिया ही दुसरीच अॅडल्ट फिल्म स्टार ठरली आहे.

पॉर्नस्टार मिया खलिफाचं चित्रपटसृष्टीत पदार्पण

मुंबई : पॉर्नस्टार मिया खलिफा लवकरच भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. 'चन्क्झ 2 : द कन्क्ल्युजन' या मल्ल्याळम चित्रपटातून मिया मोठ्या पडद्यावर डेब्यू करणार आहे.

सनी लिओननंतर भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करणारी मिया ही दुसरीच अॅडल्ट फिल्म स्टार ठरली आहे. जिस्म 2 चित्रपटातून सनीने 2012 मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. मियाने पॉर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकला असून ती पत्रकार म्हणून कार्यरत आहे.

आयटम साँगप्रमाणेच मिया चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका करणार आहे, असं दिग्दर्शक ओमर लुलू यांनी 'मनोरमा न्यूज'ला सांगितलं. प्रसिद्ध अभिनेत्री  हनी रोझही या सिनेमात दिसणार आहे.

'चन्क्झ 2' हा 'चन्क्झ' या ऑगस्टमध्ये रीलिज झालेल्या अॅडल्ट कॉमेडीटाचा सिक्वेल आहे. मे 2018 मध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरु होणार असून वर्षाच्या उत्तरार्धात सिक्वेल प्रदर्शित होईल.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Porn star Mia Khalifa to make debut in Indian film Industry with Chunkzz 2 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV