'पोस्टर बॉईज'ची आतापर्यंतची कमाई किती?

'पोस्टर बॉईज' या सिनेमात अभिनेता सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे हे प्रमुख भूमिकेत आहेत.

'पोस्टर बॉईज'ची आतापर्यंतची कमाई किती?

मुंबई : श्रेयस तळपदे दिग्दर्शित सिनेमा 'पोस्टर बॉईज' बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई करु शकलेला नाही. या सिनेमानं मागील पाच दिवसात फक्त 9.40 कोटींची कमाई केली आहे.

मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शनं ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. या सिनेमानं पहिल्या दिवशी शुक्रवारी 1.75 कोटी, दुसऱ्या दिवशी 2.40 कोटी, तिसऱ्या दिवशी 3.10 कोटी आणि चौथ्या दिवशी 1.15 कोटी आणि पाचव्या दिवशी बुधवारी 1 कोटीची कमाई केली आहे. आतापर्यंत एकूण पाच दिवसांची किंमत 9.40 कोटींची कमाई केली आहे.'पोस्टर बॉईज' या सिनेमात अभिनेता सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे हे प्रमुख भूमिकेत आहेत.

मराठी सिनेमा पोस्टर बॉईजचाच हा हिंदी रिमेक करण्यात आला आहे. तब्बल 4 वर्षानंतर दोन्ही देओल बंधू मोठ्या पडद्यावर एकत्र दिसून आले. या सिनेमाची कथा आणि डायलॉग दोन्हीही मजेशीर आहे. तरीही सिनेमागृहात गर्दी खेचण्यात हा सिनेमा यशस्वी झाला नाही.

संबंधित बातम्या :
...तर केआरकेला घरात जाऊन मारलं असतं : श्रेयस तळपदे

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV