'सैराट'च्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच, सिनेमाचं नाव...

करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असून डिसेंबरमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे

'सैराट'च्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच, सिनेमाचं नाव...

मुंबई : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या 'सैराट' चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून सिनेमाचं नाव 'धडक' असेल.

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'आर्ची'च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असून डिसेंबरमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 'धडक' 6 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.

करण जोहरने ट्वीट करुन सिनेमाचं पोस्टर लाँच केलं आहे.

https://twitter.com/karanjohar/status/930760313837780994

हा चित्रपट 18 वर्षांच्या जान्हवीचा डेब्यू आहे. 22 वर्षीय इशान मात्र माजिद माजिदी यांच्या 'बियाँड द क्लाऊड्स'मध्ये झळकला होता. तर उडता पंजाबमध्येही त्याने लहानशी भूमिका साकारली होती.

श्रीदेवीची मुलगी हिंदी 'सैराट'मध्ये 'आर्ची'च्या भूमिकेत?


खैतान यांच्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' दोन चित्रपटातून 'स्टोरी टेलिंग'चा छान अनुभव प्रेक्षकांना मिळाला होता. त्यामुळे 'धडक'कडून प्रेक्षकांना अपेक्षा आहेत.

हिंदी सैराटचं कास्टिंग झालं, जान्हवी 'आर्ची', परशा कोण?


एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराटने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. तर अनेक पुरस्कारही खिशात घातले.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Poster of Karan Johar’s Hindi remake of Sairat launched latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV