अनुष्का शेट्टीला बर्थडे निमित्त प्रभासकडून BMW कार गिफ्ट?

प्रभासने खरंच अनुष्काला हे महागडं आणि आलिशान गिफ्ट दिलं का, याबाबत अधिकृत वृत्त नाही.

By: | Last Updated: > Friday, 10 November 2017 11:23 PM
Prabhas Gifted BMW car to Anushka Shetti on birthday? latest update

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचं नातं नेहमीच चर्चेत राहिलं आहे. दोघांच्या कथित प्रेमप्रकरणाला उजाळा मिळण्याचं कारण म्हणजे प्रभासने अनुष्काला दिलेलं बर्थडे गिफ्ट. बाहुबलीस्टार प्रभासने अनुष्काला बीएमडब्ल्यू कार भेट दिल्याची चर्चा आहे.

प्रभासने खरंच अनुष्काला हे महागडं आणि आलिशान गिफ्ट दिलं का, याबाबत अधिकृत वृत्त नाही. मात्र तामिळ चित्रपटसृष्टीत याबाबत जोरदार चर्चा आहे. प्रभासच्या बर्थडेला अनुष्काने त्याला घड्याळ गिफ्ट दिल्याचं म्हटलं जात होतं.

प्रभास आणि अनुष्का येत्या डिसेंबर महिन्यात साखरपुडा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या दोघांपैकी कुणीही अद्याप साखरपुड्यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला नाही. प्रभास-अनुष्का दोघेही याबाबत बोलण्यास नेहमीच टाळाटाळ करतात.

‘बाहुबली 2’ सिनेमाच्या रीलिजनंतर प्रभास आणि अनुष्का यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या केवळ अफवा असल्याचं या दोघांकडूनही सांगण्यात आलं आणि आमच्यात केवळ मैत्री आहे, असं दोघांनीही स्पष्ट केलं होतं.

प्रभास आणि अनुष्काचा डिसेंबरमध्ये साखरपुडा?

मध्यंतरी, अनुष्का तिचं वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत होती. तेव्हा, अनुष्का साखरपुड्यासाठी वजन कमी करतेय, असा अंदाज काही जणांनी व्यक्त केला होता, तर कोणी ‘भागमती’ सिनेमाच्या शूटिंगसाठी ती वजन कमी करत असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे, अनुष्काच्या वाढत्या वजनामुळेच ‘साहो’ चित्रपटातून तिचा पत्ता कट करुन श्रद्धा कपूरची वर्णी लावण्यात आली होती.

‘बाहुबली 2’नंतर प्रभास ‘साहो’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. साहोचा फर्स्ट लूक काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आला होता. तर अनुष्काच्या वाढदिवशी ‘भागमती’चा फर्स्ट लूक रीलिज झाला.

प्रभास आणि अनुष्का यांची पहिली भेट 2009 मध्ये ‘बिल्ला’ सिनेमाच्या सेटवर झाली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली. त्यानंतर ‘मिर्ची’, ‘बाहुबली’, ‘बाहुबली 2’ अशा अनेक सिनेमांमध्ये ही जोडी एकत्र दिसली.

प्रभास आणि अनुष्काच्या साखरपुड्याची बातमी खरी होणार, की हीसुद्धा अफवाच आहे, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Prabhas Gifted BMW car to Anushka Shetti on birthday? latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा निषेधही नाही!
'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा...

मुंबई: गोव्यातील 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून

'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह
'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह

जयपूर : ‘पद्मावती’च्या विरोधाने आता हिंसक रुप घेतलं आहे.

...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!
...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!

मुंबई : अखेर 68 दिवसांचं कारण देत सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्ड फॉर

चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं
चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एका अॅडव्हेंचरपर फोटोमुळे अडचणीत

फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर
फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर

पणजी : ‘पद्मावती’ सिनेमाच्या प्रदर्शनावरुन सुरु झालेल्या वादात

संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा
संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा

पणजी (गोवा) : संजय भन्साळी कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांना

'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा
'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा

जयपूर : ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवर अभिनेत्री कंगना

‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मुंबई : ‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं

मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी
मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी

अहमदाबाद : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी

'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य
'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य

चंदीगड : ‘पद्मावती’ सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु