Exclusive : रातोरात लोकप्रिय झाल्याने घराबाहेर जाणंही बंद झालं : प्रिया प्रकाश

एबीपी माझाशी बोलताना प्रियाने अनेक गोष्टींवर दिलखुलास गप्पा मारल्या.

Exclusive : रातोरात लोकप्रिय झाल्याने घराबाहेर जाणंही बंद झालं : प्रिया प्रकाश

कोची : एका व्हिडीओतील हावभावांमुळे प्रिया वॉरियर नॅशनल क्रश बनली. अनेकांचं सोशल मीडिया स्टेटस हे प्रियाचा व्हिडीओ आहे. मात्र हे तिच्यासाठी काहीसं अडचणीचं ठरलं आहे. हे आम्ही म्हणत नाही, तिनेच याबाबत स्वतः सांगितलं आहे.

एबीपी माझाशी बोलताना तिने अनेक गोष्टींवर दिलखुलास गप्पा मारल्या. रातोरात लोकप्रिय झाल्यामुळे आता आई-वडिलांना आपल्या सुरक्षेविषयी चिंता वाढली आहे. त्यामुळे एकटीने बाहेर जाण्यासही आता मनाई करण्यात आली आहे, असं प्रियाने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

व्हिडीओ पाहिल्यानंतर मित्रांची काय प्रतिक्रिया होती, याबाबतही प्रियाला विचारलं. तर सध्या मित्रांसोबत बाहेर जाणं बंद झालं आहे, असं ती म्हणाली. लोकांचं एवढं प्रेम मिळतं तेव्हा जबाबदारीही वाढते, असं तिने सांगितलं.

प्रियाचं मुंबई कनेक्शन

प्रिया वॉरियरचे वडील सुरुवातीला मुंबईत नोकरीला होते. तिचं प्राथमिक शिक्षण मुंबईतच झालं, मात्र वडिलांनी केरळमध्ये बदली करुन घेतली. त्यानंतर पुढील सर्व शिक्षण हे केरळमध्येच झालं, असं प्रियाने सांगितलं.

दरम्यान, या व्हॅलेंटाईन डेला प्रिया सर्वांची क्रश बनली आहे. मात्र प्रियाचा क्रश अजून तरी कुणीही नाही. मुलींच्या कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे वर्गात कुणावरही क्रश असण्याचा प्रश्न नाही. सध्या तरी आपल्या को-स्टारवरच क्रश आहे, असं प्रियाने सांगितलं.

संपूर्ण मुलाखत :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: priya prakash varrier exclusive interview
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV