'कभी अलविदा ना कहना', प्रिया वारियरची श्रीदेवींना गाण्यातून श्रद्धांजली

आपल्या ऑल टाईम फेव्हरेट अभिनेत्रीच्या निधनाने दुःख झाल्याचंही तिने म्हटलं आहे.

'कभी अलविदा ना कहना', प्रिया वारियरची श्रीदेवींना गाण्यातून श्रद्धांजली

मुंबई : नॅशनल क्रश प्रिया वारियरने अभिनेत्री श्रीदेवी यांना गाण्यातून श्रद्धांजली वाहिली आहे. कभी अलविदा ना कहना हे गाणं म्हणतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या ऑल टाईम फेव्हरेट अभिनेत्रीच्या निधनाने दुःख झाल्याचंही तिने म्हटलं आहे.श्रीदेवी यांचा तीन दिवसांपूर्वी दुबईत मृत्यू झाला. मृत्यूची चौकशी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कपूर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आणि पार्थिव रात्री 9.40 वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झालं. यावेळी कपूर कुटुंबीय त्यांच्यासमवेत होतं. टीना आणि अनिल अंबानी, अनिल कपूर, सोनम कपूर विमानतळावर उपस्थित होते.

अंधेरीच्या सेलिब्रेशन क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पार्ल्याच्या स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

श्रीदेवी यांच्या चाहत्यांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून लाखो चाहते मुंबईत दाखल झाले आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Priya Prakash Varrier Sings Kabhi Alvida Na Kehna For The Late Sridevi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV