पुरुष कलाकारांनाही ‘कास्टिंग काऊच’चा सामना करावा लागतो : प्रियंका चोप्रा

बॉलिवूडमध्ये केवळ अभिनेत्रींनाच नव्हे, तर पुरुष कलाकरांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो, असं वक्तव्य तिने केलं आहे.

पुरुष कलाकारांनाही ‘कास्टिंग काऊच’चा सामना करावा लागतो : प्रियंका चोप्रा

मुंबई : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राने 'कास्टिंग काऊच'संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूडमध्ये केवळ अभिनेत्रींनाच नव्हे, तर पुरुष कलाकरांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो, असं वक्तव्य तिने केलं आहे.

‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’ या नव्या टीव्ही शोसंदर्भात आयोजित कार्यक्रमात तिने हे वक्तव्य केलं आहे.

कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ऋत्विक धनजानीनेही प्रियंकाच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. ऋत्विकने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जे नव्या लोकांने इंडस्ट्रीत येतात, त्यांचा गैरफायदा हे ते लोक घेतात. मी अतिशय भाग्यवान आहे. कारण, मला आत्तापर्यंत इंडस्ट्रीतील अनेक चांगल्या लोकांचं नेहमीच सहकार्य मिळालं आहे.

‘इंडिया नेक्स्ट सुपरस्टार’ या शोमध्ये प्रसिद्ध सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आणि रोहित शेट्टी या कार्यक्रमात जजची भूमिका साकारत आहेत. या कार्यक्रमात सर्वसामान्यांनाही आपल्यातील कौश्यल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. या शोचं प्रसारण स्टार प्लस वरुन होईल.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: priyanka-chopra says men artist also go through casting couch
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV