शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन

पाच ते सहा महिन्यांपासून ते एकाच जागेवर होते. त्यांना विविध आजारांनी ग्रासलं होतं. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन

मुंबई : सिनेनिर्माते लेख टंडन यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. ‘आम्रपाली’ (1966) आणि ‘दुल्हन वही जो पिया मन भाए’ यांसारख्या सिनेमांचंही त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून लेख टंडन हे आजारी होते. पाच ते सहा महिन्यांपासून ते एकाच जागेवर होते. त्यांना विविध आजारांनी ग्रासलं होतं. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती सिनेनिर्माता अशोक पंडित यांनी दिली.

शाहरुख सारख्या कलाकाराला शोधण्याचं श्रेय लेख टंडन यांना जातं. त्यांनी 1988 साली दिल दरिया या टीव्ही मालिकेत शाहरुखला ब्रेक दिला होता. 90 च्या दशकात दूरदर्शनवरुन प्रसारित होणाऱ्या फरमान या मालिकेचंही त्यांनी दिग्दर्शन केलं आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV