सुपरस्टार रजनीकांत हिमालयात!

रजनीकांत सोमवारी घोड्यावरुन हिमालयाची चढण चढताना दिसले होते.

सुपरस्टार रजनीकांत हिमालयात!

दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून आध्यात्मिक यात्रेवर आहे. नुकतेच त्यांचे हिमालयवारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रजनीकांत सोमवारी घोड्यावरुन हिमालयाची चढण चढताना दिसले होते.आध्यात्मिक यात्रेवर जाण्यापूर्वी रजनीकांत यांनी चेन्नई विमानतळावर पत्रकारांशी बातचीत केली होती. त्यावेळी आपली ही यात्रा किमान 15 दिवसांची असेल, असं म्हटलं होतं.

रजनीकांत दरवर्षी हिमालयाला जातात. तिथे ते आध्यात्मिक गुरुंना भेटतात. पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये ते आध्यात्मिक गुरुंशी बातचीत करतानाचा एक फोटोही सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.

नुकतंच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच हिमालय दौरा आहे.दुसरीकडे रजनीकांत यांचे दोन सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. बहुचर्चित काला हा सिनेमा 27 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे, तर 2.0 या सिनेमाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. या सिनेमात अक्षय कुमारही झळकणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rajinikanth at ancient Siva temple of Baijnath in Himachal Pradesh.
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV